कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या उपचारापासून ते त्यांची तब्येत ठीक होण्यापर्यंत घरातील प्रत्येक सदस्याला त्यांची चिंता असते. तसेच दवाखान्यातील महागडी बिल भरताना प्रत्येक जण आर्थिक संकटाना सामोरे जात असतो. तर सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे.पल्लव सिंग या एक्स (ट्विटर) युजरने त्याच्या वडिलांच्या तब्येतीबद्दल आणि दिल्लीत उपचारादरम्यान आलेल्या आर्थिक आव्हानांबद्दल एक पोस्ट शेअर केली. तसेच ही पोस्ट व्हायरल होताच बॉलीवूड अभिनेता मदतीला धावून आला.
@pallavserene एक्स (पोस्ट) नुसार पल्लव सिंग या तरुणाच्या वडिलांना १५ सप्टेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा त्यांना जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. तिथे तरुणाच्या वडिलांच्या ३ धमन्यांमध्ये अडथळा आणि हृदय फक्त २० टक्के कार्य करेल असे सांगण्यात आले आणि पुढील उपचारासाठी त्यांना नोव्हेंबरच्या अखेरीस दिल्लीत आणले. तसेच तरुणाची बहीण एआयआयएमएसमध्ये (AIIMS) हृदयरोग तज्ज्ञांना भेटण्यासाठी २४ तास रांगेत उभी राहिली.
हेही वाचा…तब्बल १५ वर्षानंतर झाली बाप लेकाची भेट, वडिलांना पाहून ढसा ढसा रडला मुलगा, व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओ नक्की बघा :
उपचारासाठी खासगी आरोग्यसेवा परवडत नसल्यामुळे कुटुंबावर होणारे भावनिक आणि आर्थिक नुकसान युजरने सविस्तरपणे काही पोस्ट शेअर करत सांगितले आहे. तसेच वडिलांबरोबर एक फोटो शेअर करून दवाखान्यातील काही कागदपत्र सुद्धा पोस्टमध्ये शेअर केले आहेत. तसेच त्याने एका पोस्टमध्ये असे सुद्धा लिहिले आहे की, माझे वडील लवकरचं मरण पावतील. हो मी काय म्हणतो आहे ते मला माहित आहे. दिल्लीच्या एआयआयएमएसमच्या रांगेत उभे असताना मी हे लिहिलं आहे. कृपया माझ्या पोस्ट वाचा असे तरुणाने लिहिले.
सोनू सूदने दिलं मदतीचं आश्वासन :
तर ही पोस्ट बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांनी पहिली. सोनू सूद हे नाव लॉकडाउन पासून अनेक गाजलं, कारण; त्याने तेव्हा अनेक लोकांची निस्वार्थपणे मदत केली होती आणि हीच गोष्ट त्याला इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळी बनवते. तर सोनू सूदने आज या तरुणाची मदत केली आहे आणि ट्विटरवर पोस्ट शेअर केली की, आम्ही तुझ्या वडिलांना काहीही होऊ देणार नाही. मला तुमचा नंबर थेट माझ्या वैयक्तिक ट्विटर (एक्स) अकाउंटवर वर खासगी मेसेज कर. पोस्ट लिहून शेअर करू नको. @sonusoodfoundation ; असा रिप्लाय सोनू सूदने केला आहे.