ब्रिटनमध्ये एका भारतीय वंशाच्या मुलाने मेन्सा बुद्धयांक चाचणीत १६२ गुण मिळवत प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि अल्बर्ट आईनस्टाईन यांनाही मागे टाकले आहे. अर्णव शर्मा असं त्याचं नाव असून, त्याने या चाचणीत १६२ गुण मिळवले आहेत. ‘ही परीक्षा खूपच अवघड असते आणि यात पास होणं ही खूपच कठीण गोष्ट आहे, या परीक्षेत मी पास होईल याची मला खात्रीही नव्हती’ अशी प्रतिक्रिया अर्णवने ‘द इंडिपेंडंटशी’ बोलताना दिलीय. ‘या परीक्षेची म्हणावी तशी पूर्वतयारी मी केली नव्हती, तेव्हा मी यात यशस्वी होईल असं मला वाटलं नव्हतं, पण जेव्हा निकाल हाती आला तेव्हा मलाच काय पण माझ्या कुटुंबियांना देखील धक्क बसला’, अशीही प्रतिक्रिया त्याने दिली.

वाचा : ‘LG’चा फुलफॉर्म माहितीये?

अर्णवने बुद्धयांक चाचणीत दोन्ही शास्त्रज्ञांना मागे टाकलं आहे. तेव्हा तो अभ्यासात हुशार आहे, याबाबत शंकाच नाही. पण एका गोष्टींचं अनेकांना आश्चर्य वाटेल की त्याला यापेक्षाही अधिक रस नृत्य आणि संगीत विषयात आहे. वयाच्या आठव्या वर्षी तो एका प्रसिद्ध डान्स शोच्या उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचला होता. याव्यतिरिक्तही स्विमिंग, बँडमिंटन, पिआनो यातही त्याला खूप आवड आहे. जगाचं पुरेपूर भौगोलिक ज्ञान अर्णवकडे आहे. जगातील प्रत्येक देशाच्या राजधानीची नावं त्याला तोंडपाठ आहे.

अर्णव याच्या यशामुळे त्याला ‘ब्रिटीश मेन्सा’चे सदस्यत्वही मिळाले आहे. भारतीयांसाठी ही अतिशय गौरवाची बाब म्हणायाला हवी. काही दिवसांपूर्वी राजगौरी पवार या केवळ १२ वर्षांच्या विद्यार्थिनीने देखील या चाचणीत स्टीफन हॉकिंग यांना मागे टाकत १६२ गुण मिळवले होते. स्टीफन हॉकिंग यांचा बुद्धयांक १६० असल्याची नोंद आहे. ज्यांचा बुद्धयांक कल अतिशय चांगला आहे, अशा २० हजार जणांपैकी राजगौरी आणि अर्णव एक आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे यातील १५०० फक्त विद्यार्थीच आहेत.

वाचा : प्रदूषण रोखणाऱ्या अशा इमारती आपल्याकडंही बांधता येतील का?

Story img Loader