Kiley Paul’s Viral Video: भारतातील एखादा नवीन चित्रपट किंवा नवीन डायलॉग चर्चेत आली की, सोशल मीडियावर अनेकांना यावर रील्स केल्याशिवाय राहवत नाही. फक्त भारतातीलच नाही तर परदेशातीलही अनेक कलाकार यावर रील्स बनवतात. काही महिन्यांपासून चर्चेत आलेल्या ‘गुलाबी साडी’, ‘सुसेकी’, ‘तौबा तौबा’ या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवले आहेत. या गाण्यावरही खूप युजर्स, अनेक कलाकार रील्स बनवताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक डायलॉग खूप चर्चेत आहे, ज्यावर अनेक जण रील बनवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल होत असून यावर इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलनेदेखील रील बनवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतातील विविध भाषांतील गाणी, डायलॉग सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर “सोचता हूं सब कुछ छोड़कर कही दूर चला जाऊं लेकिन पैसे नहीं हैं” हा डायलॉग खूप चर्चेत आहे. इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनवतो. सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलदेखील भारतीय गाण्यांवर रील्स बनवतो. दरम्यान, आता त्याने या डायलॉगवरील रील बनवला आहे जो तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, किली पॉल नेहमीप्रमाणे त्याच्या पारंपरिक वेशात असून यावेळी तो “सोचता हूं सब कुछ छोड़कर कही दूर चला जाऊं लेकिन पैसे नहीं हैं” या डायलॉगवर अभिनय करताना दिसत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी किली पॉल खरंच खूप सुंदर अभिनय करताना दिसत आहे. किली पॉलला या गाण्यावर डान्स करताना पाहून युजर्सही कमेंट्स करत आहेत.

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर नऊ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज आणि पंधरा हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘मॉडर्न आई…’ बाळाच्या अंतिम संस्कारासाठी रडत बसण्यापेक्षा तयार होतानाचं बनवलं रील; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “तुझा व्हिडीओ भारी आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “माझ्याकडे पण पैसे नाही” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “किली पॉल तुझा स्वॅग वेगळाच आहे”, तसेच अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत.

दरम्यान, किली पॉलने नुकत्याच काही दिवसांपूर्वी मल्याळम भाषेतील ‘आवेशम’ चित्रपटातील इल्युमिनाटी या गाण्यावरदेखील जबरदस्त डान्स केला होता. तसेच त्याने ‘गुलाबी साडी’ या गाण्यावरही सुंदर डान्स केला होता.