भारताचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यात बसवलेली मेटल प्लेट ६० वर्षांनंतर काढली आहे. कॉन्ट्रॅक्टर यांना मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १७ मार्च १९६२ रोजी बार्बाडोस विरुद्धच्या साईड गेममध्ये कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यावर ग्रिफिथ बाउन्सरचा फटका बसला होता. या दुखापतीनंतर ज्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली होती. ८८ वर्षीय कॉन्ट्रॅक्टर १९५५ ते १९६२ या काळात भारताकडून ३१ कसोटी सामने खेळले. घटनेच्या दिवशी झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान, कॉन्ट्रॅक्टरचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करणाऱ्या पाच जणांमध्ये वेस्ट इंडिजचा महान कर्णधार फ्रँक वॉरेल, चंदू बोर्डे, बापू नाडकर्णी, पॉली उमरीगर आणि पत्रकार केएन प्रभू यांचा समावेश होता. शुद्धीवर आल्यानंतर, कॉन्ट्रॅक्टरने कृपापूर्वक ग्रिफिथच्या पत्नीला सांगितले की ‘ही चूक त्याची आहे, गोलंदाजाची नाही.’

ग्रिफिथच्या बाऊन्सर लागल्यामुळे काँट्रॅक्टर यांना अनेक शस्त्रक्रियेतून जावं लागलं. अखेरीस १९६२ मध्ये तमिळनाडूच्या वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये त्यावेळचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंडी यांनी केलेल्या ऑपरेशनमध्ये टायटॅनियम प्लेट घातली. या शस्त्रक्रियेनंतर कॉन्ट्रॅक्टर यांनी १९६२-६३ मध्ये प्रथम श्रेणीत उल्लेखनीय पुनरागमन केले.१९७०-७१ पर्यंत गुजरात आणि पश्चिम विभागाकडून खेळले.कॉन्ट्रॅक्टर यांचा मुलगा होशेदार यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर त्याचे वडील बरे आहेत.

डावखुरा सलामीवीर असलेल्या कॉन्ट्रॅक्टर यांनी १३८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ब्रायन स्टॅथमच्या गोलंदाजीवर तुटलेल्या बरगड्यामुळे त्रस्त असतानाही १९५९ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या ८१ धावा केल्या होत्या.

Story img Loader