ऑस्ट्रेलियामधल्या वादळाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या वादळात टीनचे एक छप्पर अगदी हवेत कागदी विमान उडावा तसा उडून थेट रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारवर कोसळ्याचा थरार पहायला मिळाला. हे व्हिडीओज पाहून तेथील परिस्थिती नेमकी कशी होती, याचा अंदाज वर्तवता येतो. ऑस्ट्रेलियामधल्या न्यू साउथ वेल्स इथे १९ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर १४ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, सगळीकडे धुवांधार पाऊस कोसळतोय. व्हायरलहॉगने YouTube हा व्हिडीओ शेअर केलाय. एका व्यक्तीने त्याच्या घरातील खिडकीतून मोबाईल कॅमेऱ्याने नैसर्गिक आपत्तीचं चित्रीकरण केलंय. जोरदार वारा आणि मुसळधार पावसाने अगदी शहराची उलथापालथ केलेली दिसून येतेय. या व्हिडीओमध्ये अरुंद रस्त्यावर एक कार उभी असल्याचं दिसून येत आहे. काही सेकंदात एक टीनचं छप्पर कोठून तरी उडून येतं आणि त्या कारवरून बाजुच्या दुकानावर कोसळतं. हे दृश्य पाहिल्यानंतर मनात धडकीच भरू लागते.

आणखी वााचा : हिवाळ्यात बाहेर अंघोळ करण्यासाठी मुलाने शोधला हा कमालीचा जुगाड, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल!

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ख्रिसमस लूकमधल्या गोंडस कुत्र्याची जोरदार चर्चा; ४० मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा VIRAL VIDEO

या व्हिडीओला ३९ हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. वादळातील हे थरकाप उडवणारे दृश्य पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली वेगवेगळे कमेंट्स शेअर करण्यात सुरूवात केली आहे. वादळादरम्यान वाहन चालवणं किती धोकादायक असू शकतं, यावरही अनेक युजर्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी कारचा चालक अत्यंत भाग्यवान असल्याचं निदर्शनास आणून दिले.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आता सायकल चालवून तुम्ही बनवू शकता फळांचा रस! कसं ते पाहा…

१४ ऑक्टोबर २०२१ रोजी को सिडनी, न्यू कॅसल आणि वोलोंगॉंग मध्ये तुफाम वादळ धडकलं होतं. दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक परिणाम दिसून आले आहेत. पर्यावरण विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आलं होतं की अनेक ठिकाणी छप्पर उडून जाण्याच्या आणि पाणी साचण्याच्या घटना घडू शकतात. तरी सुद्धा काही नागरिक रस्त्यावर उतरले होते. यात रस्त्यावर कार चालवणाऱ्या चालकाच्या जीवाला मोठा धोका पोहोचण्याची शक्यता होती. पण नशीब बलवत्तर म्हणून या छ्प्पर कारवरून थेट दुकानावर कोसळले. यात कारचं प्रचंड नुकसान झालं.