कॅनडातील एक महिला तिच्या पलंगावर झोपली होती आणि अचानक अंतराळातून एक उल्का तिच्या घराच्या छतावर पडली. ही उल्का घराच्या छताला छेदून त्या महिलेच्या पलंगावर असलेल्या उशीवर पडली. ती उशी त्या महिलेपासून काही इंच अंतरावरच होती.
रिपोर्ट्सनुसार, ब्रिटिश कोलंबियामध्ये राहणारी रूथ हॅमिल्टन अचानक उठली आणि तिने तिच्या तोंडाजवळ झालेल्या मोठ्या आवाजामुळे आणि धूराने घाबरली. सांगितले जात आहे की ही घटना ४ ऑक्टोबरच्या रात्री घडली. हॅमिल्टनने व्हिक्टोरिया न्यूजला सांगितले, ‘मी अचानक उठले आणि लाईट चालू केली. शेवटी काय झाले ते मला समजू शकले नाही. याच्या एक रात्री आधी लोकांनी लुईस लेकजवळ उल्का पडताना पाहिल्या होत्या.
( हे ही वाचा: तुम्ही कधी चायनीज बिर्याणी ट्राय केली आहे का? पहा व्हायरल व्हिडीओ)
तेव्हा मी थरथर कापत होते…
या भीषण घटनेत हॅमिल्टन थोडक्यात बचावल्या. लाईट लावल्यावर त्यांना आढळले की त्याच्या उशावर एक उल्का पडली आहे. त्यांनी ९११ वर फोन केला. त्यांनी जवळच्या बांधकाम साइटवरून काही आलं नाही ना हे शोधण्याचा प्रयत्न केला. बांधकाम साइटच्या कामगारांनी सांगितले की त्यांना स्फोट दिसला नाही परंतु अंतराळातून एक तेजस्वी प्रकाश येत असताना दिसले.
( हे ही वाचा: अवघ्या काही सेकंदात एकाच वेळी चीनमधल्या १५ इमारती झाल्या जमीनदोस्त; पाहा व्हायरल व्हिडीओ)
यानंतर हे स्पष्ट झाले की हॅमिल्टनच्या घरावर एक उल्का पडली होती. या भयानक अनुभवावर हॅमिल्टन म्हणाल्या, “जेव्हा हे घडले तेव्हा मी थरथर कापत होते आणि खूप घाबरले होते. मला असे वाटले की कोणीतरी उडी मारली आहे किंवा बंदूकीची गोळी किंवा दुसरे काहीतरी आहे. पण मला समजले की उल्का अंतराळातून पडली आहे.” त्यांनी ही उल्का जपली आहे जेणेकरून त्यांची नातवंडे ते पाहू शकतील. त्या म्हणाल्या की या घटनेमुळे त्यांना जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टीकोन मिळाला आहे. “मी बोलेल की जीवन अनमोल आहे आणि ते कधीही संपू शकते, मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात सुरक्षितपणे का झोपले असेनात.