Metro Fight Viral Video: मुंबई लोकल ट्रेन असो किंवा दिल्ली मेट्रो; प्रवासादरम्यान लोकांमध्ये अनेकदा भांडण होतच असतात. आता ही भांडणं सर्वांसाठीच नेहमीची झाली आहेत. त्यात विशेषत: महिलांच्या भांडणांचं प्रमाण जास्त असतं. कधी कोणत्या गैरसमजामुळे, तर कधी मुद्दाम या स्त्रिया भांडणासाठी कारण शोधून काढतात. या भांडणात अनेक जण आपापल्या मर्यादा ओलांडतात आणि यामुळे काही भांडणं मारहाणीपर्यंत जाऊन पोहोचतात. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात दोन महिला एकमेकींशी वाद घालताना दिसतायत. इतकंच नव्हे, तर हे भांडण इतकं वाढलं की, एका महिलेनं शिवीगाळ करून दुसरीला ट्रेनमधूनच ढकलून दिलं. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…
हेही वाचा… बापरे! रेल्वे रुळावर उभा होता अन् मागून आली ट्रेन, पुढे जे झालं ते पाहून उडेल थरकाप, पाहा VIDEO
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिल्ली मेट्रोमध्ये दोन महिला एकमेकांशी भांडताना दिसल्या, या भांडणादरम्यान पुढचं स्थानक आल्यावर एका महिलेनं दुसऱ्या महिलेला मेट्रोबाहेर ढकलून दिले. रेल्वे थांबताच दरवाजे उघडले, तेव्हा एक काळा कुर्ता घातलेली महिला दुसऱ्या महिलेवर जोरात ओरडताना, शिवीगाळ करताना आणि रागाने तिला मेट्रोच्या बाहेर ढकलताना दिसली. त्यावर दुसऱ्या महिलेनंही तिला रागात प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा… “ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
हा व्हायरल व्हिडीओ @lavelybakshi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये दोन मुली एकमेकांशी भांडताना आणि धक्काबुक्की करताना दिसत आहेत,” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “आजकाल मुलींनी इतर मुलींपासून दूर राहावं, असं आम्हाला वाटतं.” दुसऱ्यानं, “सुसंस्कृत स्त्री किंवा पुरुष कधीही भांडत नाहीत,” अशी कमेंट केली.
© IE Online Media Services (P) Ltd