मागील काही महिन्यांपासून मेट्रोमध्ये अनेक प्रवासी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करताना दिसत आहेत. यामुळे कधी नाचण्याचे, कधी गाण्याचे, कधी रोमान्स तर कधी मेट्रोमध्ये आंघोळ करतानाचेही व्हिडीओ बघायला मिळाले. पण केवळ भारतातच नाही तर परदेशातही असे काही प्रवासी आहेत जे मेट्रो स्टेशनवर वेगवेगळे प्रयोग करत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने मेट्रो स्टेशनवर एक असा काही गेम बनवला आहे जो पाहून अनेकांना आपल्या बालपणीचे दिवस आठवले. अनेक प्रवासी मेट्रोमध्ये हा गेम खेळत चढत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्यासारखा आहे.
व्हिडीओमधील गेम पाहून तुम्हालाही नक्कीच बालपणीचे दिवस आठवतील. कारण तुमच्या पैकी अनेकांनी लहानपणी घरात किंवा घराबाहेर हा खेळ खेळला असेल. ज्यामध्ये खडूच्या साहाय्याने जमिनीवर खडूच्या साहाय्याने आयताकृती बॉक्स बनवले जातात. यानंतर त्यात नंबर लिहिले जातात. यानंतर प्रत्येक खेळाडू बाहेरून एक दगड बॉक्सच्या आत टाकतो. यानंतर तो दगड कोणत्याही रेषेला टच न करता एका पायाने लंगडी घालत बाहेर काढायचा असतो. या खेळाला मराठीत टिपरी पाणी, फरशी पाणी अशा अनेक नावांनी ओळखला जाते.
ट्विटरवर (@TansuYegen) नावाच्या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- मेट्रोमध्ये चढण्यापूर्वी लोकांना चांगला अनुभव मिळाला. 11 सेकंदाच्या क्लिपमध्ये मेट्रो स्टेशनवर एक माणूस पांढर्या टेपने काहीतरी बनवताना दिसत आहे. इतक्यात तिथे मेट्रो येते आणि ती व्यक्ती तिथू बाजूला होते. मेट्रो थांबताच गेट ओपन होतो. यावेळी त्या व्यक्तीने बनवलेला गेम खेळत प्रवासी डब्यात शिरतात. हे दृश्य परदेशातील एका मेट्रो स्टेशनवरील असल्याचे दिसते. पण हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येत आहे.
व्हायरल व्हिडिओ
या व्हिडीओला आत्तापर्यंत २.५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचवेळी ४ हजार लोकांनी लाइक केला आहे. याशिवाय यूजर्स कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले की, हे खूप सुंदर आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, हीच आयुष्यातील शांतता आहे.