लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या क्षणाला सुंदर बनवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. लग्नाशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ आपण ददरोज सोशल मीडियावर पाहत असतो. अनेक व्हिडीओ अतिशय मजेशीर असतात. काही लोक आपल्या लग्नात असे काही करतात की प्रत्येकजण हैराण होतो. अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका विचित्र गोष्टीमुळे हे लग्न सध्या चर्चेत आहे. ही गोष्ट काय आहे हे जाणून घेऊया.
या लग्नाची सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे वराने वधूऐवजी मगरीशी लग्न केले. या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा लोकांना खूप आश्चर्य वाटले. ही घटना आहे मेक्सिको मधील आहे, जिथे सॅन पेड्रो हुआमेल्युलाचे महापौर सेटर ह्यूगो यांनी एका मगरीशी सर्व विधी करून लग्न केले आहे. या लग्नाला हजारो लोक उपस्थित होते. या लग्नातील सर्व विधी वराच्या नातेवाईकांकडून केले जातात. पर्यावरण, मानव आणि प्राणी यांच्यातील नाते सांगणे, हा या विवाहामागचा मुख्य हेतू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मगरीशी लग्न करणे ही मेक्सिकोमधील १७८९ पासून चालत आलेली जुनी परंपरा आहे. असे मानले जाते की असे केल्याने शहरात कधीही वाईट घडत नाही आणि तो परिसर नेहमी लोकवस्तीने भरलेला राहतो. तसेच, असे केल्याने देवाकडून आपल्याला हवे असेल ते सर्व काही मिळते, अशीही येथील मान्यता आहे. याशिवाय बहुतेक लोक केवळ चांगला पाऊस आणि अधिक मासे मिळावेत यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात. महापौरांनीही याच हेतूने हा विवाह केला.
या अंतर्गत मगरीचे पहिले नाव ठेवण्यात आले आहे. यानंतर लग्नाची तारीख ठेवली जाते आणि सर्वांना लग्नाचे आमंत्रण पाठवले जाते. यानंतर सर्वांसमोर विवाह पार पाडला जातो. या लग्नादरम्यान, मगरीला पांढर्या लग्नाच्या पोशाखात वधूप्रमाणेच तयार केले जाते. त्यानंतर स्थानिक नेते त्याच्याशी लग्न करतात आणि स्वतःला दैवी पुरुष समजतात. या दरम्यान, ते मादी मगरीचे चुंबन देखील घेतात, परंतु यावेळी मगरीचे तोंड कापडाने बांधलेले असते जेणेकरून ती वराला कोणत्याही प्रकारे इजा करू शकणार नाही.