When and How to Check MHADA Lottery Result 2024 Online : मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न आत सत्यात उतरणार आहे. कारण आज बहुचर्चित महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाची लॉटरीची सोडत जाहीर झाली आहे. म्हाडाने २०२४ या वर्षात २,०३० घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. आज मंगळवारी (८ ऑक्टोबर) याच घरांच्या लॉटरीचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत जाहीर झाला आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी १०.३० वाजता सोडतीचा निकाल जाहीर झाली असून या सोडतीत एक लाख १३ हजार ५४२ अर्जदार सहभागी झाले होते.

म्हाडा मुंबईतील २०३० घरांसाठी ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर २०२४ या काळात सोडत प्रक्रिया राबवली होती, या सोडतीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. पण अर्जदारांसाठी म्हाडाची लॉटरी विजेती यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाईल.

म्हाडा लॉटरी २०२४ साठी १.१३ लाखांहून अधिक लोकांनी अर्ज प्राप्त झाले होते. मात्र त्यापैकी १,१३, ८११ जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले होते. मात्र यापैकी २६९ अर्ज अपात्र ठरले होते. त्यामुळे त्यामुळे आता १ लाख १३ हजार २४२ अर्जदारांमधून विजेते जाहीर झाले आहेत.

कुठे पाहाल म्हाडाचा ऑनलाईन निकाल?

म्हाडाच्या लॉटरीचे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पहू शकता. म्हाडाच्या युट्यूब, फेसबुक पेजवरुन अर्जदारांना सोडतीचा निकाल पाहता येत आहे.

म्हाडाची अधिकृत वेबसाईट लिंक
https://housing.mhada.gov.in

म्हाडाकडून निकाल थेट युट्यूबवर

YouTube – https://www.youtube.com/live/9F6Kss347WI

अर्जदारांना विजेत्या यादीत नाव आहे की नाही कसे समजेल?

म्हाडाच्या विजेत्या अर्जदारांना सर्वप्रथम एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तत्काळ कळविली जाणार आहे. विजेत्या अर्जदारास प्रथम सूचनापत्र पाठविले जाणार आहे. सूचनापत्रातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकारपत्र देण्यात येईल.

कोणत्या ठिकाणी आहेत ही म्हाडाची घरं?

म्हाडा लॉटरी २०२४ च्या माध्यमातून गोरेगाव, मालाड, जुहू, दादार, वरळी, अंधेरी, अँटॉप हिल, जुहू, ताडदेव, वडाळा, कन्नमवार नगर, पवई यासह अन्य ठिकाणाच्या घरांसाठी ही सोडत जाहीर केली होती.

पहाडी गोरेगावमधील मध्यम आणि उच्च गटातील घरांसह पवईतील उच्च गटातील घरांकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण म्हाडाने याठिकाणच्या घराच्या किंमती कमी केल्याने अनेकांचे लक्ष या लॉटरीकडे लागले आहे.