लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी ही वाटते तितके सोपे नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते. ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका चिमुकल्याच्या लावणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर एका तरुणाने अप्रतिम लावणी नृत्य सादर केले ज्यामुळे तो चर्चेत आला होता. सध्या चिमुकलीचे लावणी नृत्य सध्या चर्चेत येत आहेत. चिमुकलीचा अस्सल मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

व्हिडीओमध्ये चिमुकलीने ‘मी लाडाची मैना” या गीतावर लावणी नृत्य सादर केले आहे. चिमुकलीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली आहे आणि पांरपारिक दागिने परिधान केले आहेत. चिमुकलीने गाण्यावर अफलातून नृत्य केले आहे. तिच्या चेहर्‍यावरील हावभाव गाण्याला साजेसे आहे. एखाद्या नटीप्रमाणेच चिमुकली अप्रतिम नृत्य सादर करत आहे. चिमुकलीची ठसकेबाज लावणी पाहून नेटकरी फिदा झाले आहे.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर “lavanipremi” नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी चिमुकलीचे प्रचंड कौतुक केले आहे.

एकाने कमेंट केली,”अप्रतिम सादरीकरण”

दुसऱ्याने कमेंट केली की,”अतिशय सुंदर नृत्य केले.”

Story img Loader