काही वर्षांपूर्वी अडल्ट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री मिया खलिफाला सध्या सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सर म्हणून जगभरामध्ये ओळखलं जातं. दोन वर्षांपूर्वी मियाने आपल्या लग्नासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुनच पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र आता तिने याच सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन एक धक्कादायक घोषणा केलीय. मियाने पती रॉबर्ट सँडबर्गपासून विभक्त होण्याची घोषणा केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मियाने आपल्या सोशल नेटवर्किंग हॅण्डलवर यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आम्ही दोघांनी आमचं लग्न टीकावं यासाठी खूप प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. मात्र आम्हाला हव्या त्या पद्धतीने गोष्टी जूळून आल्या नाहीत. त्यामुळेच आम्ही आता वेगळं होण्याचा निर्णय घेत आहोत असं मियाने म्हटलं आहे. या पोस्टमध्ये मियाने आम्ही दोघेही एकमेकांपासून वेगळं होण्यासंदर्भात मागील एका वर्षापासून थेरिपी घेत असल्याचाही खुलासा केलाय.

नक्की वाचा >> राज कुंद्रा प्रकरण : “सनी लिओनी तर असल्या उद्योगांची क्वीन, तिला अटक करुन जन्मठेपेची शिक्षा द्या”

“आमचं लग्न टिकावं म्हणून आम्ही सर्व प्रयत्न केले असं आम्हाला आत्मविश्वासाने सांगता येईल. मात्र जवळजवळ एक वर्ष यासंदर्भातील थेरेपी आणि प्रयत्न करुन झाल्यानंतर आम्ही या निर्णयापर्यंत पोहचलो आहोत की आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र राहू शकतो. आम्ही लग्न वाचवण्यासाठी बरीच खटाटोप केली. आम्ही दोघे एकमेकांवर नेहमी प्रेम करत राहू आणि एकमेकांचा आदर करु,” असं मियाने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

“आयुष्यातील हा सुंदर चॅप्टर बंद करताना आम्हाला कसलाही पश्चाताप होत नाहीय. आम्ही दोघे नव्याने सुरुवात करणार आहोत. आम्ही वेगळे होणार असलो तरी आमची कुटुंब, मित्र परिवार आणि लाडक्या पाळीव कुत्र्यांवर असणारं प्रेम तसच राहणार आहे. आम्ही लग्न टीकावण्यासाठी प्रय़त्न केले, वेळ घेतला याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही शक्य ते सर्व काही केलं. फार प्रयत्न केल्यानंतरच आम्ही दूर जाण्याचा निर्णय घेतलाय याचं समाधान आम्हाला आहे,” असं या पोस्टमध्ये मियाने पुढे म्हटलं आहे.

पतीपासून वेगळं होण्याच्या या घोषणेच्या काही दिवसआधी मियाने पती रॉबर्ड सँडबर्गला इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ‘द सन’च्या एका वृत्तानुसार मियाने पहिल्यांदा २०११ मध्ये लग्न केलं होतं. हे लग्न तीन वर्ष टीकलं. २०११ ते २०१४ दरम्यान मियाचं पहिलं लग्न टीकलं. नंतर मियाने घटस्फोट घेतला होता. मात्र तेव्हा मियाचा नवरा कोण होता याबद्दल तिने काहीच खुलासा केला नव्हता. या दोघांचा एकही फोटो जगासमोर आला नाही. नंतर तिने २०१९ मध्ये रॉबर्टसोबत लग्नाची घोषणा केली होती.