चहाच्या लहानश्या पेल्यात चहाप्रेमींचं जग व्यापलं आहे. आनंद असो किंवा तणाव चहाप्रेमींना चहा हा लागतोच. अगदी दिवसाची सुरुवात ते संध्याकाळी घरी आल्यानंतर यांना घोटभर चहा हा लागतोच. सध्या मार्केटमध्ये अनेक चहाची दुकाने व चहाच्या टपरीही उपलब्ध आहेत. पण, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स (Bill Gates) यांनी एका नागपूरच्या प्रसिद्ध चहा विक्रेत्याची भेट घेतली आहे. तर काय आहे या चहा विक्रेत्याची खासियत? बिल गेट्स यांनी चक्क या चहा विक्रेत्याची का घेतली भेट? चला तर पाहूयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिल गेट्स सध्या भारतात आहेत. तसेच या दरम्यान त्यांनी नागपूरचा प्रसिद्ध ‘डॉली चायवाला’ विक्रेत्याच्या स्टॉलला भेट दिली आहे. ‘डॉली की टपरी’ असे या चहा विक्रेत्याच्या स्टॉलचे नाव आहे. गेल्या २० वर्षांपासून हा चहा विक्रेता स्टॉल चालवतो आहे. चहा दुकानाचा मालक डॉली याच्या हाताची चव आणि त्याच्या अनोख्या स्वॅगमुळे तो सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. चहा विक्रेता उंचावरून उकळणाऱ्या चहाच्या द्रोणात दूध ओततो व एकही थेंब खाली पडू देत नाही. हीच भन्नाट स्टाईल आज त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेली आहे.

हेही वाचा…मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव! चक्क पूर्ण सोसायटीत केली फुग्यांची सजावट; चिमुकलीचे जोरदार स्वागत पाहून नेटकरी झाले भावूक

व्हिडीओ नक्की बघा :

तर या खास गोष्टीमुळे बिल गेट्स यांनीसुद्धा ‘डॉली चायवाला’ या विक्रेत्याची भेट घेण्याचे ठरवले आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ‘वन चाय प्लीज’ असे म्हणत बिल गेट्स या विक्रेत्याकडे कपभर चहा मागताना दिसत आहेत. त्यानंतर बिल गेट्ससाठी हा चहा विक्रेता अनोख्या स्टाईलमध्ये चहा बनवण्यास सुरुवात करतो. त्याने हातगाडीवर चहाचा हा स्टॉल मांडला आहे आणि उंचावरून उकळणाऱ्या चहाच्या द्रोणात दूध ओततो आहे व बिल गेट्स यांनीसुद्धा आनंदाने चहाचा स्वाद घेतलेला दिसून आले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ बिल गेट्स यांच्या @thisisbillgates या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करीत, “भारतात तुम्ही जिथेही फिराल तिथे तुम्हाला नवीन काहीतरी पाहायला मिळेल, अगदी साधा कप चहा तयार करतानाही!”; असे भारतीयांचे कौतुक करत त्यांनी कॅप्शन लिहिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसून आले आहेत.