आजकाल अनेक लोक असे आहेत ज्यांना प्रचंड एकटेपणा जाणवतो. नोकरीसाठी किंवा पैसे कमावण्यासाठी अनेक लोक घरापासून दूर जातात, अनोळखी शहरात एकटे राहतात आणि आपले काम करतात. अशावेळी अनेकांना एकटे पडल्यासारखे वाटते. चांगल्या पगाराची नोकरी असूनही त्यांच्याजवळ बोलण्यासाठी कोणीही नसते. अशाच एकाकी पडलेल्या व्यक्तीची सर्वत्र चर्चा होत आहे. एकटेपणा दूर करण्यासाठी या व्यक्तीने असे काही केले ज्याची कल्पना देखील कोणी केली नसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका एक्स वापरकर्त्याने अलीकडेच दावा केला की,”बंगळुरूमध्ये त्याला एकाकीपणाचा सामना करण्यासाठी ऑटो-रिक्षा चालवणारा एक मायक्रोसॉफ्टचा कर्मचारी भेटला. व्यंकटेश गुप्ता यांनी हुडी जॅकेट घातलेल्या माणसाचा फोटो शेअर केला आहे ज्यावर मायक्रोसॉफ्टचा लोगो आहे.

गुप्ता यांनी एक्सवर पोस्ट शेअर करताना लिहिले, “कोरमंगला येथील मायक्रोसॉफ्टमधील एका ३५ वर्षीय कर्मचारी सॉफ्टवेअर अभियंत्याला भेटले जे एकटेपणा वाटू नये यासाठी नम्मा यात्री करिता आठवड्याच्या शेवटी(शनिवार-रविवार) रिक्षा चालवत होते.

हेही वाचा – लिफ्टमध्ये अडकला माणूस पण मागे वळताच…; नेमकं घडलं तरी काय? VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

२१ जुलै रोजी शेअर केलेल्या या पोस्टला ३, ५४,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. “जेव्हा तुम्ही शहरात (BLR) फक्त एकच भाषा बोलता तेव्हा असे होते जेथे ५०% पेक्षा जास्त लोक बाहेरचे असतात,” असे एका वापरकर्त्याने सांगितले. दुसरा म्हणाला, “आउटेजचा परिणाम” ते मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवांमध्ये मोठ्या समस्येचा संदर्भ देत होते ज्यामुळे १९ जुलै रोजी भारतासह जगभरातील अनेक व्यवसायांमध्ये सेवेत अडथळा निर्माण झाला होता. दुसऱ्या दिवशी, मायक्रोसॉफ्टने सांगितले की,”ग्लोबल टेक आउटेज सायबर सिक्युरिटी फर्मच्या सॉफ्टवेअर अपडेटशी संबंधित आहे. CrowdStrike आणि जवळपास ८.५ दशलक्ष मायक्रोसॉफ्ट उपकरणांवर परिणाम झाला.

हेही वाचा – पावसाळ्यात धबधब्यावर जाण्याआधी हा Video पाहा! अचानक पाण्याचा जोर वाढला अन् अडकले ७० पर्यटक

पण वापरकर्त्यांच्या एका वर्गाने मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्याने ऑटोरिक्षा चालवल्याचा दावा फेटाळून लावला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft employee in bengaluru found driving autorickshaw to combat loneliness netizen reacts snk