माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानली जाणारी मायक्रोसॉफ्ट कंपनी खूप प्रसिद्ध आहे. तर या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे ऑफिस कसे असेल, इथे कर्मचाऱ्यांना कोणत्या सुविधा असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकदा मनात निर्माण होते. आज हैदराबादमधील मायक्रोसॉफ्ट कंपनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर कर्मचारी यांनी एखाद्या ट्रेंडप्रमाणे ऑफिस कॅम्पसमध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या सुविधा आहेत ते सांगणारी एक रील शेअर केली आहे; जी सध्या अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘वि आर मायक्रोसॉफ्ट एम्प्लॉई’ (We Are Microsoft Employee) असे म्हणत त्यांनी हा ट्रेंड सुरू केला आणि एकेक करून प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांच्या ऑफिस कॅम्पसची वैशिष्ट्ये सांगितली. व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नाश्ता करण्यासाठी व्हेंडिंग मशीन आहे; जिथे मोफत चिप्स, कोल्ड्रिंक असे पदार्थ, तर दुपारच्या जेवणासाठी ‘सबवे’ ते ‘बस्किन’पर्यंतचे पर्याय कर्मचाऱ्यांसाठी आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना संपूर्ण आठवडाभर घालण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’चे टी-शर्टसुद्धा देण्यात आले आहेत.
हेही वाचा…VIDEO: आलिशान गाडीतून एंट्री अन् दहीवड्याचा स्टॉल; विक्रेत्याची शैली पाहून व्हाल अवाक्
व्हिडीओ नक्की बघा :
कर्मचाऱ्यांना इथे काम आणि वैयक्तिक जीवनाचा उत्तम समतोल राखता येतो. तसेच कर्मचाऱ्यांना कोणत्याही ठिकाणाहून लॅपटॉपवरून काम करण्याची मुभा आहे. एआयपासून ते गेमिंगपर्यंतच्या अनेक गोष्टींवर इथे कर्मचारी काम करतात. कर्मचाऱ्यांना विश्रांती घेण्यासाठी सुंदर रूम, तसेच निवांत वेळ व्यतीत करण्यासाठी छोटासा तलाव आणि मनोभावे पूजा करण्यासाठी मंदिरसुद्धा आहे.
मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटनुसार कॅम्पसमध्ये २४x७ रुग्णवाहिका आणि फार्मसी, लॅण्डस्केप केलेले ८०० सीटर आउटडोअर ॲम्फी थिएटर, वायफाय कनेक्टिव्हिटीसह बस सेवा, बँक, एटीएम, व्यायामशाळा, योगा यांसारख्या सुविधादेखील इथे उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @twosisterslivingtheirlife and @sactrivedi या युजर्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या सोई-सुविधा पाहून नेटकरी ”या नोकरीसाठी कुठे अर्ज करू शकतो” ; असे कमेंटमध्ये भावूक होऊन विचारताना दिसत आहेत.