Microsoft Windows Outage : संगणक क्षेत्रातील सुप्रसिद्ध कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील यूजर्सना अडचणींचा प्रचंड सामना करावा लागतो आहे. आज (१९ जुलै) दुपारपासूनच अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडायला लागले असून त्यावर फक्त निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे त्याचा मोठा फटका जगभरातील अनेक क्षेत्रांना बसला आहे. जगभरातील बँका आणि विमानतळांवरील कामदेखील ठप्प झालं आहे. त्यामुळे बऱ्याच जणांची गैरसोय होत असून आम्ही याबाबत माहिती घेत असल्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीनं म्हटलं आहे. एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे समाज माध्यमांवर मीम्सचा महापूर आला आहे.

हेही वाचा : मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं!

Train accident young woman train accident while crossing the railway track brutal accident video viral on social media
बापरे! तिच्या एका निर्णयामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं; रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेन आली अन्…, तरुणीचा काळजात धडकी भरवणारा VIDEO व्हायरल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shocking video of little boy making pushpa style reel after car accident video viral on social media
बापरे! कारचा चक्काचूर, कुटुंब मृत्यूच्या दारात अन् चिमुकला बनवतोय रील; VIDEO पाहून बसेल धक्का
Shocking video of daughter-in-law harassed mother-in-law sun and sasu dispute viral video on social media
“सून कधीच मुलगी होऊ शकत नाही”, पायऱ्यांवर ढकललं, मारहाण केली अन्…, सूनेने केला सासूचा छळ; संतापजनक VIDEO व्हायरल
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
Puneri poster marketing poster for recruitment went viral on social media
पुणेकरांच्या मार्केटिंगचा नाद नाय! अशा ठिकाणी लावली नोकरीची जाहिरात की…, VIDEO पाहून म्हणाल मानलं पठ्ठ्याला
Emotional video of young girl driving cycle rikshaw for family responsibility viral video on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! तरुण मुलीचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
New car accident in Pune car owener got emotional viral video on social media
VIDEO: असं नशीब कोणाच्याच वाट्याला येऊ नये! पुण्यात नवीकोरी कार घेतली अन्…, ‘त्या’ माणसाबरोबर जे घडलं ते पाहून डोळ्यात येईल पाणी

समाज माध्यमांवर मीम्सचा महापूर

एरव्हीही जेव्हा फेसबुक, इंस्टाग्राम अथवा ट्विटरसारखी समाज माध्यमे काही तांत्रिक कारणास्तव काम करेनाशी होतात, तेव्हाही युझर्सकडून कमालीची सर्जनशीलता दाखवली जाते. बरेच जण मीम्स, विनोद आणि गंमतीशीर व्हिडीओ प्रसारित करुन या परिस्थितीतही एकमेकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. आता मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड होऊन खोळंबा झाल्यानंतरही समाज माध्यमांवर सर्जनशीलतेला ऊत आला आहे. अनेक जण मीम्स शेअर करुन या परिस्थितीमुळे उद्भवलेला ताण कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मीम्सचा महापूर

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आयटी कंपन्यातील कर्मचारी खुश असल्याचे अनेक मीम्समधून चित्रित करण्यात आले आहे. आज शुक्रवारी (१९ जुलै) ही घटना घडल्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा वीकेंड फारच आनंदात जाणार असल्याचेही काही मीम्समधून सांगण्यात आले आहे.

तर एका मीममध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीमधील या बिघाडाला डॉली चायवाला आणि बिल गेट्स यांची भेट कारणीभूत असल्याचेही म्हटले आहे. त्याचेही एक मीम सध्या तुफान व्हायरल होत आहे.

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड होऊन संगणकाची स्क्रीन निळी दिसत असल्याकारणाने कंपन्यांमधील संपूर्ण आयटी डिपार्टमेंटच निळे झाले असल्याचे एका मीममधून दाखवण्यात आले आहे.

असे अनेक तुफान मीम्स सध्या समाज माध्यमांवर प्रसारित होत असून खासकरुन यामुळे आयटी कर्मचारी खुश असल्याचे चित्रित केले जात आहे.

हेही वाचा : तुमचाही लॅपटॉप शट डाऊन होतोय? जाणून घ्या कशी सोडवायची समस्या…

यंत्रणेत काय झालाय बिघाड?

मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी सुरक्षा उपाय पुरवणारे सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्म ‘क्राऊडस्ट्राईक’ (CrowdStrike) अयशस्वी ठरल्यामुळे यंत्रणेत बिघाड झालेला असू शकतो, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळेच जगभरातील विमानसेवा, बँका आणि इतर सर्व ऑनलाईन सेवा ठप्प झाल्या आहेत. विडोंज ऑपरेटिंग सिस्टिम वापरणारे लाखो वापरकर्ते आता त्यांचा लॅपटॉप बंद झाल्याची तक्रार करत आहेत. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस हेल्थ स्टेटसच्या माहितीनुसार, Azure backend workloads मध्ये काही बदल केल्यानंतर स्टोरेज आणि कंम्प्यूट रिसोर्समध्ये आता व्यत्यय निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून मायक्रोसॉफ्ट ३६५ या ऑपरेटिंग सिस्टिमवर अवलंबून असलेल्या सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत.

Story img Loader