मायक्रोसॉफ्ट हे आज तंत्रज्ञान जगतात खूप प्रसिद्ध नाव आहे. या कंपनीने जगभरात संगणकाची लोकप्रियता शिखरावर नेली. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनची स्थापना बिल गेट्स आणि त्यांचे बालपणीचे मित्र पॉल ऍलन यांनी ४ एप्रिल १९७५ रोजी केली होती. या संगणक सॉफ्टवेअर कंपनीने ४ एप्रिल रोजी ४७ वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने बिल गेट्स यांनी एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कंपनीच्या यशाचा अभिमान वाटून त्यांनी लिहिले की, कंपनी लोकांना सक्षम करण्यासाठी सतत काम करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिल गेट्स यांनी जुना व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ते मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये खुर्चीवर उडी मारताना दिसत आहेत. “प्रत्येक डेस्कवर आणि प्रत्येक घरातील संगणकात मायक्रोसॉफ्टचा हेतू पूर्ण करण्यासाठी झेप घेतली आहे. मला अभिमान आहे की कंपनी प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी काम करत आहे.” गेट्स यांनी कंपनीच्या ४७ वर्षांच्या निमित्ताने लिहिले आहे.

  • १९७५ – १९ वर्षीय बिल गेट्स यांनी हावर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्या पौल अॅलेन या लहानपणीच्या मित्रासोबत सॉफ्टवेअर कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि या दोघांच्या कल्पनेतून साकार झाला अल्टेअर ८८०० मायक्रोकॉप्यूटरसाठीचा प्राथमिक तत्वावरील ‘सॉफ्टवेअर प्रोग्राम’
  • १९७९- सॉफ्टवेअर क्षेत्रात १९७८च्या अखेरीपर्यंत विक्रीदर १ कोटींच्या घरात पोहोचल्यावर मायक्रोसॉफ्टने आपले मुख्य कार्यालय वॉशिंग्टनमध्ये सुरू करण्याचे ठरविले.
  • १९८०- जून महिन्यात, बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टसाठी हावर्ड विद्यापीठातील त्यांचा वर्गमित्र स्टिव्ह बॉलमर यांचा व्यवसाय व्यवस्थापक पदावर निवड केली.
  • १९८१- ऑगस्टमध्ये, या कंपनीने मायक्रोसॉफ्ट डिस्क ऑपरेटींग सिस्टम(एमएस-डॉस) संकल्पना सॉफ्टवेअर क्षेत्रात आणली. याचा वापर ‘आयबीएम’च्या कॉम्प्यूटर्समध्ये केला गेला.
  • १९८३- ‘एमएसडॉस’मध्ये आणखी नवे बदल करून ‘विंडोज’ संकल्पना सॉफ्टवेअर क्षेत्राला दिली.
  • १९८५ – ‘विंडोज’ प्रणालीवर दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर मायक्रोसॉफ्टने ‘विंडोज १.०’ प्रणाली विकसीत केली. यातून सॉफ्टवेअर क्षेत्रात पहिल्यांदा ‘माऊस’चा वापर करून ‘मॉनिटर’वरील इच्छित ‘फोल्डर्स’वर क्लिक करता आले
  • १९८६ – मायक्रोसॉफ्टने आपल्या आर्थिक कमाईत उल्लेखनिय प्रगती करत ६० कोटी यूएस डॉलर्सचा आकडा गाठला.
  • १९८८ – याकाळात विंडोजमध्ये आणखी प्रगती करत विंडोज २.० दाखल झाला. याच काळात मायक्रोसॉफ्ट कंपनी कॉम्प्यूटर्ससाठी सॉफ्टवेअर निर्माण करणारी जगातील सर्वात आघाडीवरील कंपनी बनली.
  • १९९०-९५: मायक्रोसॉफ्टने १९९० मध्ये विंडोज ३.० सॉफ्टवेअर विकसीत केले आणि त्यानंतर केवळ पाचवर्षांनंतर ‘विंडोज ९५’ सॉफ्टवेअर दाखल झाला.
  • १९९५ नंतर- सॉफ्टवेअर क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत मायक्रोसॉफ्टने आपला स्वत:चा ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’ नावाचा इंटरनेट सर्च निर्माण केला.

करोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि शैक्षणिक क्षेत्रात मायक्रोसॉफ्टमुळे मोलाची मदत झाली. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या कार्यावर लक्ष केंद्रित करू इच्छित असल्याचे सांगून गेट्स यांनी २००० या वर्षी कंपनीचे सीईओ पद सोडले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft turns 47 bill gates shared an old video rmt