बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने जेव्हा सिनेजगतात प्रवेश केला तेव्हा अभिनयाव्यतिरिक्त त्याची दोन बोटे पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटत होतं. निसर्गाने काहीतरी वेगळं निर्माण केलेलं पाहून लोकांना नेहमीच आश्चर्य वाटत असतं. त्यामुळेच चीनमधून आलेला दोन तोंडी साप, दुतोंडी कासव किंवा चार हातांचं बाळ पाहून सगळेच दंग झाले. असाच काहीसा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चार कान असलेली मांजर पाहून लोक हैराण झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर रशियन वंशाची मांजरीची बरीच चर्चा रंगलीय. या अनोख्या मांजरीला एक नाही, दोन नाही तर चार कान आहेत. या चार महिन्यांच्या मांजरीचं नाव मिडास आहे आणि तिचे स्वतःचे इंस्टाग्राम पेज देखील आहे. या इन्स्टाग्राम पेजवर ४६ हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. केवळ मांजरीचे कान आश्चर्यकारक नाहीत, तर तिच्या छातीवर एक पांढरी जन्म खूण देखील आहे. एका हृदयाच्या आकारात ही जन्म खूण दिसून येत आहे.

तुर्की महिलेने चार कानाच्या मांजरीला घेतलं दत्तक

अनेक प्राणी प्रेमी मांजरींसाठी अक्षरशः वेडे असतात. मांजरीची खोडकर मस्ती पाहून सारेच जण त्यांच्या प्रेमात पडतात. अलीकडेच एका महिलेने ही अनोखी मांजर दत्तक घेतली आहे. या मांजरीला नवं घर मिळाल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर आनंद साजरा केलाय. तुर्कीस्तानमधील एका महिलेने ही अनोखी मांजर दत्तक घेतली आहे. कॅनिस डोसेमेसी असं या तुर्की महिलेचं नाव आहे. याआधी तिच्याकडे १२ वर्षाची एक कुत्री सुद्धा आहे. तिच्या घरी कुत्री सुजी आणि नवी पाहूणी म्हणून आलेली मांजर दोघी खेळताना फोटो देखील व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : VIDEO VIRAL : ससा आणि ट्रेनमध्ये रंगली शर्यत ? आयुष्याच्या शर्यतीत पाहा कुणी मारली बाजी…

एका व्हिडीओमध्ये ही अनोखी मांजर तिची मैत्रिणी सुजीला गुड नाईट किस देताना दिसत आहे. मांजरीची शिक्षिका कॅनिस हिने सांगितले की, तिचे चार कानामुळे तिच्या ऐकण्यावर परिणाम होत नाही. ती इतर मांजरीप्रमाणेच प्रतिसाद देत असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

Story img Loader