दिवसा नोकरी आणि रात्री १० किलोमीटर धावत घरी जाणारा प्रदीप मेहराच्या मेहनतीचे सगळीकडून कौतुक केले गेले. अनेकजणांनी त्याला आर्थिक मदतही देऊ केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर तो ‘मिडनाइट रनर’ म्हणून प्रसिद्ध झाला. नुकतंच शॉपर्स स्टॉपने प्रदीपला अडीच लाखांची आर्थिक मदत केली आहे. प्रदीपच्या आईचे उपचार आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मदत करण्यात आली आहे. चित्रपट निर्माता विनोद कापरी यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदीपची आई बिना देवी दिल्लीतील नांगले येथील रुग्णालयात दाखल आहेत. त्या टीबी आणि आतड्याच्या आजाराने त्रस्त आहेत. प्रदीपची बहीणही आईसोबत राहते. प्रदीप हा त्याच्या भावासोबत नोएडा येथे राहतो.

Viral Video: महिला जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थींनीसोबत केलेला ‘नगाडा बजा’वरील डान्स पाहून सारेच थक्क

नायजेरियन अ‍ॅक्टर्सनी उडवली हिंदी मालिकांची खिल्ली; Viral Video पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

प्रदीप मेहरा मॅकडोनाल्ड्समध्ये काम करतो आणि नोकरी सुटल्यावर बरोला येथील त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी दररोज रात्री १० किमी धावतो. तसेच सैन्यात भरती होण्याचे प्रदीपचे स्वप्न आहे. प्रदीप बारावी उत्तीर्ण आहे. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, क्रिकेटपटू हरभजन सिंग, क्रिकेटपटू केविन पीटरसन, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेकांनी सैन्यात सामील होण्याच्या प्रदीपच्या उत्साहाचे कौतुक केले आहे.

प्रदीपचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतम बुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी सुहास एल. यथिराजन यांनी प्रदीपची भेट घेतली. त्यांनी प्रदीपला पुढील अभ्यास आणि करिअर समुपदेशनाबद्दल सांगितले. यासोबतच त्याच्या आईच्या उपचाराचा रिपोर्टही मागवला होता. याशिवाय पुरोगामी समाजवादी पक्षाचे युवाजन सभेचे नेते अमित जानी यांनी प्रदीपच्या आईच्या उपचारासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

आयआयटी कानपूरला १०० कोटींची देणगी देणारे ‘राकेश गंगवाल’ कोण आहेत माहिती आहे का? जाणून घ्या

निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी प्रदीपला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर चाचणी उत्तीर्ण करण्यात मदत करण्यासाठी कुमाऊँ रेजिमेंटचे कर्नल, पूर्व आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल राणा कलिता यांच्याशी संवाद साधला. तसेच, पंजाबमधील मिनर्व्हा येथील फुटबॉल क्लबचे संचालक रणजीत बजाज यांनी मेहराला मोहाली अकादमीमध्ये प्रशिक्षण देण्याची ऑफर दिली आहे.