‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री उशीरा निधन झाले. पाकिस्तानात भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या मिल्खांना पाकिस्तानचे राष्ट्रपती आयूब खान यांनी ‘फ्लाईंग शिख’ ही उपाधी दिली होती. मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर सोशल मिडीयावर त्यांच्या चाहत्यांनी श्रद्धाजंली वाहत त्यांना भारत रत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. यामुळेच Bharat Ratna हे आज सोशल मिडीयावर ट्रेंडिग मध्ये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिल्खा सिंग यांनी १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. ४०० मीटर शर्यत सर्वात जलद पुर्ण करण्यााच विश्व विक्रम देखील अनेक वर्ष त्यांच्या नावावर होता. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खेळासोबतच सामाजिक कार्यात देखील मिल्खा सिंग अग्रेसर होते. त्यांच्या प्रेरणेमुळे अनेकांनी खेळ विश्वात चमकण्याचे स्वप्न पाहिले. १९९९ मध्ये कारगिल युद्धात विरमरण प्राप्त करणारे हवलदार विक्रम सिंग यांच्या मुलाचे पालकत्व मिल्खा सिंग यांनी स्विकारले होते.

खेळ आणि सामाजिक श्रेत्रात दिलेल्या योगदानामुळेच लोकांनी त्यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा ही मागणी सोशल मिडीयावर केली तर अनेकांनी फक्त पुरस्कारांनी कोणती प्रतिष्ठा प्राप्त होत नसते मिल्खा सिंग हे खरे भारत रत्न आहे, ते भारताचे रत्न आहे हे सिद्ध करण्यास कोणत्या पुरस्काराची गरज नाही अशा पोस्ट देखील केल्या.