एखाद्या स्त्रीने स्वत:ची ओळख करून देताना ‘मी गृहिणी आहे,’ असं सांगितल्यावर तुमच्या मनात काय विचार येतो? ‘ ‘ती’ फार काही महत्त्वाची नसणार,’ असंच अनेकांचे तिच्याविषयीचं ‘फर्स्ट इंप्रेशन’ असतं. अनेकदा ती स्वत:देखील स्वत:विषयी असाच विचार करत असते. पण जेव्हा समोर एखादं मोठं संकट आल्यानंतर हिच गृहिणी काय करू शकते, याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. पुणेकर असलेल्या एका धाडसी गृहिणीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. बस चालवता चालवता बसचा ड्रायव्हर अचानक बेशुद्ध पडला. मात्र, त्यानंतर या पुणेकर गृहिणीने जे केलं ते पाहून तुम्ही तिला कडक सोल्यूट कराल, हे मात्र नक्की.
घडलेली हकीकत अशी की, वाघोलीमधून २२ ते २३ महिला एकत्र मिळून शिरूर इथल्या मोराची चिंचोली इथे फिरायला जाण्यासाठी एका मिनी बसमधून गेले होते. मोराची चिंचोली इथे दिवसभर पिकनीक एन्जॉय करून त्याचा ग्रूप पुन्हा घरी परतण्यासाठी निघाले. अचानक त्यांची मिनी बस नागमोडी वळणे घेत धावू लागली. हे पाहून मिनी बसमधल्या सर्व महिला घाबरून गेल्या आणि आरडाओरड करू लागल्या. याच महिलांच्या ग्रूपमधल्या एका महिलेने ड्रायव्हरच्या सीटजवळ येऊन पाहिले तर धक्कास बसला. कारण बसचा ड्रायव्हरच्या हातात स्टेअरिंग नव्हतीच आणि तो सीटवर बेशुद्धावस्थेत पडलेला होता. त्याचे डोळे पांढरे झाले होते, हातपाय वाकडे झाले होते आणि तो जागेवरच फीट येऊन पडला होता. हे पाहिल्यानंतर या पुणेकर गृहिणीने कोणताही विचार न करता ड्रायव्हरला सीटवरून बाजुला करून त्या सीटवर बसून बसचं स्टेअरिंग आपल्या हातात घेतलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
आणखी वाचा : अन् बघता बघता कागदाप्रमाणे पूल वाहून गेला…हे भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद, पाहा VIRAL VIDEO
या व्हायरल व्हिडीओमधल्या ४२ वर्षीय गृहिणीचं नाव योगिता सातव असं आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी मिनीबसचे स्टेअरिंग हातात घेतलं होतं. समोर घडलेलं मोठं संकट पाहून त्यांनी बसचं स्टेअरिंग हातात घेण्याचं धाडस केलं आणि सर्व प्रवाशांचे प्राण सुरक्षितपणे वाचवले.
योगिता सातव यांनी फक्त प्रवाशांचेच प्राण नाही वाचवले तर बेशुद्ध झालेल्या ड्रायव्हर सुद्धा त्यांनी तातडीने रुग्णालयात नेलं. शाळेत जाणाऱ्या दोन मुलांची आई असलेल्या या योगिता सातव यांनी मिनी बस चालवत सुमारे २५ किमी प्रवास केला. त्यांनी वेळेत ड्रायव्हरवरला उपचारासाठी रुग्णालयात नेल्याने त्याचा जीव देखील वाचवला. ही घटना ७ जानेवारीची आहे.
आणखी वाचा : थंडीत सकाळी उठायला आळस येतो म्हणून ही आयडिया वापरली, एकदा हा Viral Video पाहाच
पिकनीक एन्जॉय करून परतत असताना काही अंतर बस चालवल्यानंतर अर्ध्या रस्त्यातच ड्रायव्हरला अस्वस्थ वाटू लागलं. योगिता यांच्या म्हणण्यानुसार, ड्रायव्हरने त्याला चक्कर येत असल्याचं सांगितलं होतं आणि त्याला काहीही दिसत नसल्याचं तो सांगत होता. त्याला काही स्पष्ट बोलता येत नव्हतं. तो बसही चुकीच्या पद्धतीने चालवू लागला. हे पाहून बसमधल्या महिलांनी आरडाओरडा सुरू केला. त्या ड्रायव्हरच्या सीटच्या अगदी मागे बसल्या होत्या. यापुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “ड्रायव्हरच्या बाजुला जाऊन त्यांनी विचारलं, “काय प्रॉब्लेम आहे?” ड्रायव्हरने त्यांना अस्पष्ट आवाजात अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : या चिमुकल्याने आईकडे स्वतःच्या लग्नासाठी तगादा लावला; म्हणतो, “माझेही मुलं होतील!”
पुढे काही बोलण्याच्या आत ड्रायव्हर अचानक बेशुद्ध पडला. काही महिला जवळ आल्या आणि त्यांनी चालकाला दुसऱ्या सीटवर बसवलं. योगिता यांनी त्यांना गाडी चालवता येत असल्याचं सर्वांना सांगितलं आणि सर्व महिलांनी त्याला बसचं स्टेअरिंग हातात घेण्याची परवानगी दिली. त्याचवेळी संपूर्ण रस्ता सुनसान आणि अंधार झाल्याने त्या परिसरातून बाहेर पडणं गरजेचं होतं, हा विचार करून त्यांनी बस चालवत सर्व महिलांना सुखरूप आणलं.
आणखी वाचा : याला म्हणतात कर्माचे फळ! उंटाला त्रास देत होता हा माणूस आणि…पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : Viral Video : बहिणीच्या लग्नात मुलीने असा धमाकेदार डान्स केला की, सर्व म्हणाले… “बिजली,बिजली!”
योगिता यांनी जेव्हा स्टेअरिंग हातात घेऊन बस चालवायला सुरूवात केली त्यावेळी बसमधल्या काही महिलांनी त्यांचा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला आणि बघता बघता तो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. यूट्यूबवर CSK WORKS नावाच्या चॅनलवरही हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक कमेंट्समध्ये या गृहिणीव कौतुकाचा वर्षाव करत आहेत.