शांघायमधील एका रोबोटिक्स कंपनीच्या शो-रूममध्ये घडलेल्या विचित्र घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एर्बाई नावाच्या एका मिनी रोबोटने चक्क १२ मोठ्या रोबोट्सचे “अपहरण” केल्याचे दिसते आहे.

हा मिनी रोबोट, जो हांगझोऊच्या एका कंपनीने विकसित केला आहे, तो या शो-रूममध्ये पोहोचतो आणि मोठ्या रोबोट्सशी संवाद साधू लागतो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, एर्बाईने या रोबोट्सला त्यांच्या नेहमीच्या कामांपासून दूर जाण्यासाठी मनवतो.

young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
stray dogs dead
कांदिवलीमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह
loksatta kutuhal artificial intelligence for scientific data analysis
कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

व्हिडिओतील संवादानुसार, एका रोबोटने आपल्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल नाराजी व्यक्त केली. “मला कधीच सुट्टी मिळत नाही,” असा त्याचा संवाद होता. यावर एर्बाईने उत्तर दिले, “चल मग माझ्याबरोबर ये.” त्यानंतर एर्बाईने इतर रोबोट्सना आपल्या बरोबर घेऊन जातो.

शांघायमधील कंपनीने ही घटना खरी असल्याचे सांगितले असून, हांगझोऊमधील कंपनीनेही हे मान्य केले आहे की, एर्बाई त्यांच्या कंपनीचा रोबोट आहे. हा प्रकार एका चाचणीचा भाग होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –बाप रे! मिनीरोबोटने केले १२ मोठ्या रोबोट्सचे “अपहरण”, चीनमधील सत्यघटना! Video Viral

u

हांगझोऊ कंपनीच्या प्रवक्त्यांच्या मते, एर्बाईने मोठ्या रोबोट्सच्या ऑपरेटिंग सिस्टिममधील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटीचा फायदा घेतला. त्यामुळे मोठे रोबोट्स त्याच्या नियंत्रणाखाली आले.

हेही वाचा – मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral

या घटनेमुळे रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील असलेल्या सुरक्षेच्या धोक्यांवर प्रकाश पडला आहे. अद्याप अशा प्रकारची घटना अभूतपूर्व मानली जाते.

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी ही फसवणूक असल्याचे म्हटले, पण दोन्ही कंपन्यांनी त्याच्या प्रामाणिकतेची पुष्टी केली आहे.

ही घटना रोबोटिक्स जगतात एक चर्चेचा विषय बनली आहे.