सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका सायकलस्वाराला कार चावलवणाऱ्या मुलाने मुद्दाम धडक दिल्याचं दिसत आहे. इतकेच नव्हे तर कारमधील आरोपींनी या भयानक घटनेचा व्हिडिओ शूट केला होता. जो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार चालवणारी दोन्ही मुलं अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कारचालक आणि त्याच्या शेजारी बसलेला त्याचा सहकारी कार चालवताना जोरजोरात हसत असल्याचं ऐकू येत आहे. याचवेळी त्यांना रस्त्यावरुन जाणारा एक सायकलस्वार दिसतो आणि ते मागचा पुढचा काहीही विचार न करता थेट सायकलस्वाराच्या अंगावर कार घालतात. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सायकलस्वार रस्त्याच्या एका बाजून सायकल चालवत आहे. यावेळी कार चालवणारा मुलगा मुद्दाम सायकलस्वाराच्या मागे कार घेतो आणि कारचे स्पीड वाढवतो, त्यामुळे कार वेगाने पुढे जाते आणि सायकलस्वाराला जोरात धडक देते.
हेही पाहा- VIDEO: खाकी वर्दीतले दोन पोलीस रस्त्यातच भिडले; कारण वाचून व्हाल थक्क…
पाहा व्हिडीओ –
https://twitter.com/JohnLeFevre/status/1703022271235825854
मिळालेल्या माहितीनुसार, सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे तर सायकल चालवणारा व्यक्ती पोलीस खात्यात अधिकारी पदावरुन निवृत्त झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही अल्पवयीन मुलांनी आधी कार चोरली आणि नंतर हा गुन्हा केला आहे. या अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एका ट्विटर युजरने लिहिलं, “कारमधील मुलं त्यांचे उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवण्यास पात्र आहे. अपघात पाहून मलाही भीती वाटली.” तर दुसऱ्याने लिहिलं, “या गुन्ह्याची शिक्षा मृत्यूपेक्षा कमी असू शकत नाही.” मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींंना अटक केली असून सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांनी चोरीची कारदेखील ताब्यात घेतली आहे.