Cricket match viral Video : क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं आणि ते सत्यच आहे. कारण क्रिकेटच्या मैदानात एकतर्फी सुरु असलेला सामना दुसऱ्या संघाच्या बाजूने कधी रंग बदलेल, याचा नेम नाही. अटीतटीच्या सामन्यात एका षटाकात किंवा एका चेंडूमुळं सामन्याचं रुपडं बदलल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले असतील. पण एका व्हायरल झालेल्या व्हिडीओनं क्रिकेटप्रेमींना चक्रावून टाकलं आहे. क्रिकेटचा सामना सुरु असताना गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूवर पुल शॉट मारूनही फलंदाज बाद झाला. फलंदाज बाद होण्यामागचं कारणही कुणाला समजलं नसावं. कारण स्टंपला ना चेंडूचा ना बॅटचा संपर्क झाला. तरीही बेल्स खाली पडल्या अन् फलंदाजाचा खेळ खल्लास झाला.
चकत्कारी व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
हा व्हिडीओ राजकीय नेते आणि माजी क्रिकेटर किर्ती आझादने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच आझाद यांनीही कॅप्शनमध्य म्हटलंय, “भूताचा खेळ आहे..” तसंच नेटकऱ्यांनीही म्हटलं, क्रिकेटच्या मैदानावर भूत तर नाही आहे ना? व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. ७५ हजारांहून अधिक प्रतिक्रिया या व्हिडीओवर देण्यात आल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “खरंच भूत असतो का?” तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं म्हटलं, “आश्चर्याचा धक्का देणारा हा व्हिडीओ आहे.”
इथे पाहा व्हिडीओ
क्रिकेटच्या मैदानात सहा चेंडूवर सहा षटकार ठोकण्याचे विक्रमही आपण पाहिले आहेत. एका चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना संघाला विजय मिळवून देणाऱ्या फंलदाजांचे व्हिडीओही समोर आले आहेत. पण या व्हिडीओनं इंटरनेटवर जास्तच धुमाकूळ घातला आहे. कारण स्टंपला कसलाही स्पर्श न होता बेल्स खाली पडल्याने फलंदाजाला पव्हेलियनचा रस्ता बघावा लागला. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेल्स क्रिकेटच्या मैदानात आपोआप जमिनीवर खाली पडतात, असा चमत्कार याआधी कधी पाहायला मिळाला नसले. पण आता व्हायरल झालेल्या या व्हिडीओत हा चमत्कार तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण नक्कीच म्हणाले असतील, “खरंच क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे.”