आजकाल विचित्र खाद्यपदार्थांचा ट्रेंड सुरु आहे. लोक अनेक पारंपारिक खाद्यपदार्थांवर प्रयोग करून त्याला ट्विस्ट देतात आणि काहीतरी नवीन पदार्थ तयार करतात जे अत्यंत विचित्र असतात. सोशल मीडियावर अशाच अनेक विचित्र खाद्यपदार्थांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी गुलाबजाम पराठा तर कधी बटर आइस्क्रिम पाव. एका पेक्षा एक विचित्र पदार्थ पाहायला मिळत आहेत. आता या यादीत आणखी एका पदार्थांची भर पडली आहे ज्याचे नाव आहे मिरचीचा हलवा. होय…तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. मिरचीचा हलवा बद्दल सांगत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका लग्नामध्ये मिरचीचा हलवा हा विचित्र पदार्थ पाहुण्यांना दिला जात आहे. लग्नातील डेसर्ट काऊंटवर हा पदार्थ दिला जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. हा विचित्र पदार्थ पाहून उपस्थित बुचकळ्यात पडले होते पण त्यांना हा पदार्थ कसा लागत असे हे जाणून घेण्याची उत्सुकताही दिसत होती. काही लोक हा मिरचीचा हलवा देखील खाऊन पाहत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विवाह सोहळ्यातील अपारंपरिक स्वयंपाकाच्या निवडींबाबत चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा – “ये रातें ये मौसम!”, सनम पुरीच्या गाण्यावर चिमुकलीने सादर केला सुंदर डान्स, Viral Video पाहून तिच्या प्रेमात पडाल

क्लिपमध्ये एका तव्यावर मिरचीने सजलेले आणि खाण्यायोग्य चांदीच्या फॉइलचा थर लावलेला दिसत होता. हिरव्या मिठाईचा हलवा एक व्यक्ती सर्वांना वाटत होता. जलेबी आणि गुलाब जामुन सारख्या पारंपारिक मिठाईच्या बरोबरीने हा मिरचीचा हलवा ठेवलेला आहे. व्हिडीओमध्ये काही महिला पहिल्यांदा मिरचीचा हलवा पाहून थक्क झाल्या होत्या आणि आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहे.

हेही वाचा –अमानवी कृत्य! कुत्र्यांना धावत्या कारच्या छतावर ठेवले अन् जाब विचारणाऱ्याला केली शिवीगाळ, Video Viral पाहून नेटकरी संतापले

हा क्षण कॉन्टेट क्रिएटर बाला मलिक यांनी हा व्हिडिओ शुट करून आपल्या इंस्टाग्रामवरपोस्ट केला आहे. “मिरची हलवा , मी पहिल्यांदाच या मिठाईबद्दल ऐकले आहे ,” व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे, ज्याने एक दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून आश्चर्य व्यक्त करतील. बऱ्याच वापरकर्त्यांनी त्यांचे आश्चर्य व्यक्त केले. अनेकांनी मिरचीचा हलवाबद्दल पहिल्यांदा ऐकल्याचे सांगितले.

तुम्ही कधी मिरचीचा हलवा ट्राय केला आहे का?