Viral Video : मिसळ हा झणझणीत महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. विशेषत:पश्चिम महाराष्ट्रात मिसळ आवडीने खाल्ली जाते.कडधान्याच्या रस्सेदार तर्रीत फरसाण टाकले जातात. त्यात कांदा, बटाटा आणि शिजवलेले पोहे घालून मिश्रण बनवले जाते, याला मिसळ म्हणतात. पूर्वी ही मिसळ नुसतीच खाल्ली जायची आता या मिसळबरोबर पाव आवडीने खातात. पुणेरी मिसळ, कोल्हापूरी मिसळ, नाशिक मिसळ अशा अनेक मिसळ लोकप्रिय आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना मिसळ आवडते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वृद्ध पती पत्नी मिसळ खाताना दिसत आहे. मिसळ प्रेमी आजी आजोबांना पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

अनेक मिसळप्रेमी आवडीने सोशल मीडियावर मिसळ खातानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. आजी आजोबांचा मिसळ खातानाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला फक्त मिसळवरील त्यांचे प्रेम दिसणार नाही तर त्याबरोबर त्यांचे एकमेकांवरील प्रेम सुद्धा दिसून येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Dance kaka ajoba
लग्नात काका अन् आजोबांनी केला झिंगाट डान्स! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “प्रत्येक लग्नात एक तरी नातेवाईक….”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shocking video Cow attack on peoples children on road dangerous shocking video viral on social Media
भयंकर! गायीचा एकावेळी तिघांवर जीवघेणा हल्ला, टोकदार शिंग पोटात घुसवलं पायांनी तुडवलं अन्…; VIDEO पाहून थरकाप उडेल
Old man plays drums at wedding emotional video viral on social Media
VIDEO: “गरिबी आणि जबाबदारी वय बघत नसते” या वयात आजोबांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Grandfather sings song vasant sena for grandmother romantic video viral on social Media
VIDEO: प्रेम असावे तर असे! डोळ्यात अशी माझ्या ठसली मला वसंत शैना दिसली; आजोबांचा रोमँटिक अदांज, आजीसाठी गायलं भन्नाट गाणं
e a man holding mirror for a wife while doing makeup in mahakumbh mela
Video : नवऱ्याचं असं प्रेम मिळायला नशीब लागतं राव! बायकोला मेकअप करताना त्रास होऊ नये म्हणून… महाकुंभ मेळ्यातील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
an old man in 90s do exercise
VIDEO : नव्वदीतही आजोबा करताहेत व्यायाम! तरुणांनो, मग तुम्ही का कारणं देता? Video Viral
a old man dance in the village on nachare mora ambyachya vanat marathi song video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गाण्यावर भर कार्यक्रमात आजोबांनी केला अजब डान्स; VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

या व्हायरल व्हिडीओमध्ये नऊवारी नेसलेली आजी दिसत आहे. तिने कपाळावर टिकली आणि डोक्यावर पदर घेतलेला आहे. ही आजी एकटी नाही तर तिच्याबरोबर आजोबा सुद्धा आहे.हे दोघेही वृद्ध पती पत्नी मिसळचा आस्वाद घेताना दिसत आहे.या व्हिडीओवर लिहिलेय, “या वयात आज पण दोघे जोडीने मिसळ खायला येतात. यालाच तर खरं प्रेम म्हणतात.. मिसळप्रेमी”

हेही वाचा : याला म्हणतात खरी कला! भररस्त्यात तरुणाने केला अप्रतिम डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “रस्त्यावरच्या कलाकाराला..

gunjal_patil_bhel_and_misal या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या वयात आज पण दोघे जोडीने मिसळ खायला येतात यालाच तर खरे प्रेम म्हणतात.”
या कॅप्शनमध्ये हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे, हे सुद्धा सांगितले आहे. कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ संगमनेर येथील आहे.या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “प्रेम बोलतात ते हेच काय” तर एका युजरने लिहिलेय, ” तर एका युजरने लिहिलये, “हेच खरं वय असतं प्रेमाचं” आणखी एका युजरने लिहिलेय, “मस्त आजी आजोबा”

Story img Loader