अमेरिकेतील ब्रुकलिन येथे न्यूयॉर्क सिटी कौन्सिलवुमन बरोबर टीव्ही मुलाखतीदरम्यान एक भयानक प्रकार घडला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ब्रुकलिन कौन्सिलवुमन इन्ना वर्निकोव ही गुरुवारी ब्राइटन बीच येथे सीबीएस न्यूयॉर्कला मुलाखत देत होती, असे नेटवर्क रिपोर्टर हन्ना क्लिगर याने सांगितले. या मुलाखतीदरम्यान एका व्यक्तीने ब्रुकलिनबरोबर असे काही कृत्य केले की, ज्यामुळे ती खूप संतापली.
अचानक आला आणि गालावर किस करुन गेला –
व्हिडिओमध्ये, रिपोर्टर इन्ना वर्निकोवला प्रश्न विचारण्यापूर्वी, एक टोपी घातलेला माणूस अचानक इन्नाच्या डाव्याबाजूला झुकतो आणि तिच्या गालावर किस करुन निघून जातो. यावेळी अनोळखी व्यक्तीने घेतलेल्या किसमुळे इन्नाला धक्का बसतो आणि ती मोठ्याने ओरडते. ही सर्व विचित्र आणि भयानक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्या व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘अशा प्रेमाची अपेक्षा नव्हती’
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, इन्नाला किस केल्यानंतर तो व्यक्ती रस्त्यावरून जाण्यापूर्वी मागे बघतो, हसतो. यावेळी इन्ना त्याच्यावर रागवल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, वर्निकोवने या घटनेनंतर शुक्रवारी ट्विट केले, ज्यामध्ये तिने लिहिलं आहे. “मला मतदारांकडून अशा प्रकारच्या प्रेमाची अपेक्षा नव्हती, हा खूप भयानक क्षण होता.”
काही नगर परिषदेच्या सदस्यांनी वर्निकोवबरोबर घडलेल्या घटनेनंतर किस करणाऱ्या व्यक्तीवर टीका केली आहे. ब्रॉक्सच्या मार्जोरी वेलाझक्वेझ यांनी ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं “दुर्दैवाने महिलांच्या दैनंदिन जीवनात ही घृणास्पद वागणूक खूप सामान्य होत आहे. आम्ही लैंगिक छळ हा आमच्या सार्वजनिक संभाषणाचा एक सामान्य भाग होऊ देऊ शकत नाही.” दरम्यान, या व्हिडीओवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असल्याचंही पाहायला मिळत आहे. काहींनी हा लैंगिक छळ असेल्याचं म्हणत आहेत.