Viral video: मुली आज कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत, पूर्वी सातच्या आत घरात मुलींनी यायलाच हवं असं बंधन मुलींना असायचं. मात्र आता मुली कोणत्याही शिफ्टला बिंधास्तपणे काम करतात, रात्रीच्यावेळी एकटी स्त्री संधी नाहीतर जबाबदारी आहे असं समाजानं मान्य केलं आहे. असं असलं तरी बलात्कार, अत्याचार, छळ याचं प्रमाण शंभर टक्के कमी झालेलं नाहीये. आजही मुलींना या सगळ्याला सामोरं जावं लागतं. काही नरधमांमुळे सगळ्यांचं नावं खराब होतं.
आपल्याच देशातील नाही तर बाहेरच्या देशातून राज्यातून आलेल्या मुलींनाही हे नराधम सोडत नाहीत. असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका रशियन महिलेची एका व्यक्तीने छेड काढली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तरुणाचं गैरवर्तन
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी रशियन असून एक युट्युबर आहे. ती भारतात फिरायला आलेली असताना मोबाईलमध्ये व्लॉग बनवताना दिसत आहे. तेवढ्यात तिच्या मागून एक तरुण येतो आणि तिला फॉलो करतो. नंतर तो तीचे सगळे व्हिडीओ पाहत असल्याचं सांगत तुझ्याशी मैत्री करायची आहे असं सांगतो. यावर ती तरुण ती नकार देते, तरीही तो तिच्या मागे चालत राहतो. मी तुम्हाला ओळखत नाही, त्यावरही तो मैत्री झाल्यावर ओळख होईल असं उत्तर देतो.
संतापजनक VIDEO व्हायरल
त्याचा वेडेपणा आणि गैरवर्तन तरुणीच्या लक्षात आल्यावर ती तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते, यावेळी तो पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि यावेळी तर तो तिला चक्क “तू खूप सेक्सी आहेस” असं म्हणतो. यावर ती तिथून त्याला बाय बोलून निघून जाते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> अन् बाप जिंकला…लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टर वडिलांनी ५० व्या वर्षी दिली NEET परीक्षा
हा व्हिडीओ koko_kvv या या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकवेळा हे व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटते, नेटकरीही तरुणाच्या या वागणुकीवर संताप व्यक्त करत आहेत.