जगभरात नावलौकीक असलेल्या मिस श्रीलंका सौंदर्य स्पर्धेतील धक्कादायक प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्टेटन आयलॅंडवर आयोजित केलेल्या या स्पर्धेला उपस्थित प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्यानं गालबोट लागलं आहे. अनेकांनी धक्काबुक्की करून स्टेजवर धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. पुरुषांसह महिलांनी एकमेकिंच्या झिंज्या उपटत हाणामारी केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या स्पर्धेत जवळपास ३०० प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली होती.
काय घडलं नेमकं?
श्रीलंका देशातील सध्याच्या कठीण परिस्थितीतवर मात करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, एकीकडे स्पर्धा सुरु असताना स्टेजच्या दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्यानं एकच खळबळ उडते. या संपूर्ण घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या स्पर्धेच्या आयोजिका सुजनी फर्नान्डो न्यूयॉर्क पोस्टशी बो या हाणामारीत १४ स्पर्धकांपैकी एकाचाही सहभाग नव्हता. श्रीलंकेचे नागरिक खूप चांगले आहेत. ही फक्त तुंबळ हाणामारी आहे. अशा प्रकारच्या घटना कोणत्याही राष्ट्रामध्ये आणि समाजात घडत असतात. श्रीलंकेचा या घटनेशी काहीही संबंध नाही. आम्ही अशा विचारसरणीची माणसं नाही आहोत.
इथे पाहा व्हिडीओ
अनेक तरुण कलाकार आपल्या सौंदर्य खुलवण्यासाठी काबाडकष्ट करून मोठ्या स्टेजवर नृत्य सादर करण्याचा प्रयत्न करतात. अशातच जागतिक पातळीवर रॅम्प वॉकची स्पर्धा असल्यावर अनेक तरुण मॉडेल्स प्रचंड मेहनत घेत असतात. मात्र, अशा मोठ्या स्पर्धांमध्ये एखादी वाईट घटना घडून गालबोट लागल्यास या तरुण कलाकारांचा आत्मविश्वास कमी होतो. अशीच एक थरारक घटना न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या मीस श्रीलंका या स्पर्धेत घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंटस् केल्या. एकाने म्हटलं, श्रीलंकेच्या सौंदर्य स्पर्धेचा शेवट भन्नाट हाणामारीने झाला. तर दुसऱ्याने म्हटलं, हाणामारी करणाऱ्या सर्वांवर कायेदशीर कारवाई झाली पाहिजे.