वादग्रस्त विधानांमुळे कधी नेत्यांना आपले पद सोडावे लागते तर कधी मान्यवरांना जनतेची माफी मागावी लागते. तुर्कीमधील एका सौंदर्यवतीने असेच अतिशय वादग्रस्त विधान केल्याने तिलाही त्याची किंमत चुकवावी लागली. तिने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तिचा सौंदर्यवतीचा किताब काढून घेण्यात आला. त्यामुळे सोशल मीडियावर बेजबाबदार वक्तव्य करणे या सौंदर्यवतीला भलतेच महागात पडले. १८ वर्षांच्या या सौंदर्यवतीचे नाव आहे इतिर इसेन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इतिरला काही दिवसांपूर्वीच तुर्कीमध्ये ‘मिस तुर्की’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. हा सन्मान मिळाल्यानंतर तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अतिशय धक्कादायक विधान केले. या विधानामध्ये तिने मासिक पाळीतील रक्ताची तुलना शहिदांच्या रक्ताशी केली. तुर्कस्थानात झालेल्या सत्तांतराच्या प्रयत्नात सुमारे २५० जणांना आपले प्राण गमवावे लागले. १५ जुलैला तुर्कीतील सत्तांतराच्या प्रयत्नाचा पहिला वर्धापन दिवस होता. या पार्श्वभूमीवर इतिरने हे वादग्रस्त ट्विट केले होते.

Viral Video : पाणीपुरी खाण्याची ‘अशी’ पद्धत तुम्ही कधी पाहिलीये?

तिचे हे वादग्रस्त ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तिच्या या बेजबाबदार वक्तव्यामुळे केवळ तुर्कीतच नाही तर जगभरातून तिच्याविषयी संताप व्यक्त करण्यात आला. याचा परिणाम म्हणजे स्पर्धेच्या आयोजकांनी तिचा मिस तुर्की हा किताब अखेर काढून घेतला. या स्पर्धेत रनरअप ठरलेल्या अस्ली सुमेनला तिचा हा पुरस्कार देण्यात आला असून, सुमेन चीनमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत तुर्कस्थानाचं प्रतिनिधीत्व करणार आहे. विविध स्तरातून इतिरच्या पोस्टला विरोध झाल्यनंतर तिने दिलगिरीही व्यक्त केली