मलेशियातील तवाऊ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एक ६० वर्षीय वृद्ध व्यक्ती चार दिवसांपासून बेपत्ता होती. या व्यक्तीचे कुटुंबीय आणि पोलीस तिचा शोध घेत होते. परंतु कुठेही शोध लागत नव्हता. अखेर त्या व्यक्तीला मगरीने गिळंकृत केल्याचे समजल्यावर लोकांनी त्या मगरीला ठार केलं. त्यानंतर मगरीचं पोट फाडून या ६० वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे बाहेर काढण्यात आले आहेत. तब्बल १४ फूट लांब असलेल्या या भल्या मोठ्या मगरीच्या पोटातून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

दरम्यान, मृतदेह त्याच मगरीच्या पोटात सापडेल ही गोष्ट तपास पथकांना कशी समजली याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मगरीच्या पोटातून त्या व्यक्तीच्या मृतदेहाचे तुकडे बाहेर काढण्यात आले आहेत. या व्यक्तीचं नाव आदी बंगसा असं होतं. तवाऊ फायर अँड रेस्क्यू स्टेशनचे प्रमुख जेमिशिन उजिन यांनी पुष्टी केली आहे की, मगरीचं पोट फाडलं तेव्हा मृत व्यक्तीचे कुटुंबीय तिथे हजर होते. मगरीचं पोट फाडण्यापूर्वी आधी तिला गोळी घातली होती.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा

उजिन यांनी सांगितलं की, सलग चार दिवस आम्ही आदी बंगसा यांचा शोध घेत होतो. चौध्या दिवशी आमच्या पथकाला दुसऱ्या एका बचाव पथकाने मगरीबद्दल माहिती दिली. त्या बचाव पथकाने सांगितलं की, त्या व्यक्तीला (आदी बंगसा) मगरीने गिळलंय. बंगसा जिथून बेपत्ता झाले तिथला मगरीचा वावर पाहता बचाव पथकाने दिलेली माहिती खरी असण्याची शक्यता बळावली.

हे ही वाचा >> Video: शॉर्टकटच्या नादात अंगावरून अख्खी ट्रेन गेली अन्…; हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

तब्बल १२६ किलो वजनाची मगर

उजिन यांनी सांगितलं की, २२ जुलै रोजी दुपारी ३ च्या दरम्यान मगरीला गोळी मारली. त्यानंतर काही तासांनी तिचं पोट फाडलं. मगरीचं पोट फाडलं तेव्हा बंगसा यांचं कुटुंब तिथे हजर होतं. या मगरीचं वजन १२६ किलो आणि लांबी १४ फूट इतकी होती.

Story img Loader