सोशल मीडिया असं व्यासपीठ आहे की रातोरात एखाद्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळते. तर काही पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ नेटकरी डोक्यावर घेतात. अशीच एका वृत्तपत्रातील जाहिरातींनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आजकाल वृत्तपत्रातील जाहिराती केवळ रिकाम्या जागा भरण्यासाठी नाहीत, तर वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा असतो. वृत्तपत्रातील शेरवानीची जाहिरात नेटकऱ्यांच्या दृष्टीक्षेपात पडली आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल नेमकं या जाहिरातीत काय आहे?. या जाहिरातीबद्दल वाचताना सुरुवातीला वाटेल एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती आहे. पण शेवटपर्यंत वाचलं की कळते ही एका शेरवानीची जाहिरात आहे.

कोलकात्यातील सुलतान नावाच्या शेरवानी विक्रेत्याने ही जाहीरात दिली आहे. आपल्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ‘ही व्यक्ती हरवली आहे’ (Missing Person) अशी जाहिरात दिली आहे. रेड्डिटवर जाहिरातीचं छायाचित्र पोस्ट केलं होतं. “उंच , गोरा आणि देखणा, वय २४ वर्षे. माझा लाडका मुलाक मजनू हरवला आहे. कृपा करून घरी परत ये. सर्वांना तुझी काळजी वाटत आहे. आम्ही तुझ्या दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. ‘लैला’ तुझी वधू असेल आणि लग्नाची शेरवानी सुलतान (द किंग ऑफ शेरवानी) येथून खरेदी करू”. शेवटच्या ओळीतून ही जाहीरात असल्याचं कळतं.

वृत्तपत्रातीला जाहिरातीवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, ‘हे वाचताना सुरुवातीला वाटलं की तो खरंच हरवला आहे. पण शेवटी शेरवानीची जाहिरात असल्याचं कळलं.’. तर दुसऱ्या युजर्सने असं लिहिलं आहे की, ‘खरंच तो मुलगा हरवला असता आणि अशी जाहिरात दिली असती तर’.

Story img Loader