Shark Attack Off South Australia Coast: सर्फिंग म्हणजे लाटांवर स्वार होण्याचा खेळ. या साहसी खेळाचं वेड सध्या तरुणाईमध्ये वाढत आहे. तुम्ही हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहिले असेल की, लोक लाटांवर स्वार होत सर्फिंग करत असतात आणि अचानक एक शार्क हल्ला करतो. ही कल्पना देखील भयानक आहे पण प्रत्यक्षात असे काही घडले तर…. चित्रपटांमध्ये दिसणारे हे दृश्य आता प्रत्यक्षात घडत असल्याचे समजत आहे. ऑस्ट्रेलिया एलिस्टनच्या बेटावर सर्फिंगचा आनंद घेणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. या सर्फरवर शार्कने हल्ला केल्याचे मानले जात आहे.

साऊथ ऑस्ट्रेलियात घडली घटना

सर्फरवर शार्कने हल्ला केल्याच्या चर्चेमुळे ऑस्ट्रेलियाच्या या समुद्रावर लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना साऊथ ऑस्ट्रेलियातील आयर पेनिनिसुलाजवळ घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथे एलिस्टन नावाच्या ठिकाणी जास्त लोकवस्ती नाही पण समुद्र किनाऱ्यांवरील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आह

Shark Tank
ग्राहक म्हणून तक्रार, मालकालाच केलं डेट अन् झाली कंपनीची सह-संस्थापक; शार्क टँक शोमध्ये आलेल्या जोडप्याची भन्नाट लव्हस्टोरी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Most dangerous sea in the world
‘हे’ आहेत जगातील सर्वांत ५ धोकादायक समुद्र; घ्या जाणून…
namita thapar shark tank india 4 (1)
Shark Tank India 4: जोडप्याने मार्केटमध्ये आणले अंडरगारमेंट डिटर्जंट; नमिता थापर म्हणाली, “तुम्ही गुंतवणूकदारांना…”
MahaRERA Urges District Collector To Take Action Against Defaulting Developers
सहा विकासकांकडे २४९ कोटी थकीत; वसुलीसाठी महारेराकडून उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
Woman dressed as mermaid dancing Inside water tried to eaten by giant fish shocking video
बापरे! महिला पाण्यात जलपरी बनून परफॉर्मन्स करत होती तितक्यात समोरून आला मासा, तोंडात पकडलं डोकं अन्…VIDEO पाहून धक्का बसेल
Action plan for water transport in Mumbai news
मुंबईतील जलवाहतुकीसाठी कृती आराखडा
Which schools in Wardha district have water that is dangerous to drink
धोकादायक! ‘या’ शाळांतील पाणी पिण्यास घातक, जीवावर बेतणार…

४६ वर्षीय तरुणावर शार्कच्या हल्ल्याची चर्चा

पोलिसांनी आपल्या तपासानंतर सांगितले की, एलिस्टनच्या वॉकर रॉक्स बीचवर सर्फिंग करताना ४६ वर्षाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. असे मानले जात आहे की, त्याच्यावर शार्कने हल्ला केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे

हेही वाचा – एम. एस. धोनी नव्हे Captain Dhoni Sparrow! AIच्या मदतीने आर्टिस्टने केली कमाल! व्हायरल फोटो पाहिला का?

४६ वर्षीय तरुणावर शार्कच्या हल्ल्याची चर्चा

या प्रकरणाबाबत पोलिसांचे मत आहे की, या व्यक्तीचा मृत्यूच्या मागे सध्यातरी दुसरे कोणतेही कारण दिसत नाही आणि हे स्पष्टपणे दिसत आहे की सर्फिंगदरम्यान शॉर्कच्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असावा. हा व्यक्ती गेल्या कित्येक दिवसांपासून बेपत्ता आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, शोधकार्यात मदत केल्याबददल पोलिसांनी स्थानिक लोक आणि आपात्कालिन सुविधा देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

यापूर्वी येथे एका मुलीचादेखील शार्कच्या हल्ल्यात मृत्यू

एलिस्टनच्या परिसरात जास्त लोकसंख्या नाही. येथे साधारण १००० नागरिक राहतात पण येथे पर्यटकांची संख्या जास्त आहे. सुंदर समुद्र किनाऱ्यांमुळे हा परिसर सर्फिंग स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे. एलिस्टनमध्ये शार्कच्या हल्ल्याची ही पहिली घटना नाही, या आधी देखील फेब्रुवारीमध्ये एका मुलीचा सर्फिंग दरम्यान शार्कच्या हल्यात मृत्यू झाला होता. तेव्हापासून बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये शार्कच्या हल्ल्याची भिती निर्माण झाली आहे

हेही वाचा – हर्ष गोयंकांनी शेअर केला दुरदर्शनचा जुना व्हिडिओ, लोक म्हणाले,” Ad आहे की Funny Video”

शार्कचे हल्ले समुद्री किनाऱ्यावर वाढत आहे. अमेरिका वगळता इतर कोणत्याही देशापेक्षा ऑस्ट्रेलियामध्ये शार्कचे जास्त हल्ले होतात. गेल्या महिन्यात हवाई येथील होनोलूलू बीचवर एका शार्कने सर्फरवर हल्ला केला होता, ज्यामध्ये तो तरुण वाचला पण त्याला आपला एक पाय गमवावा लागला

Story img Loader