‘थ्री इडियट’ हा चित्रपट तुम्ही सगळ्यांनीच पाहिला असेल. यातला एक सीन तुम्हाला आठवतोय का? जेव्हा रँचो हॉस्टेल सोडून निघत असतो तेव्हा प्रियाच्या अर्थात करिनाच्या बहिणीला प्रसुती कळा सुरू होतात, पण शहरात पाणी साचलं असतं अशा वेळी रँचो तिची प्रसुती करतो. हा थ्री इडियट मधला एपिक सीन म्हणावा लागेल. पण हे झालं चित्रपटातलं हो! ख-या आयुष्यात असं घडलं तर? या जर तरच्या गोष्टी राहू दे मिझोराममध्ये असाच एक प्रकार घडला आहे. मिझोरामच्या एका आमदाराने चक्क आयत्या वेळी एका महिलेची शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले.
Viral Video : अंगावरून ट्रेन जाऊनही ‘ती’ सुखरूप
Viral : मतदानासाठी वापरण्यात येणा-या कृत्रिम बोटांचे सत्य उघड
मिझोराममधले ५२ वर्षीय आमदार डॉ. बेचाऊ यांनी वैद्यकिय शिक्षण घेतले . इम्फाळाच्या वैद्यकिय महाविद्यालयातून त्याने एमबीबीएस केलं. १९९१ साली त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी राजकाराणात प्रवेश केला. मिझोरामच्या साहिला जिल्हा रुग्णालयात एका महिलेला दाखल केले होते. तिची प्रकृती अत्यंत चिंताजन होती. पण या रुग्णालयातले सर्जन एका ट्रेनिंगसाठी बाहेर गेले होते. बेचाऊ यांनी या महिलेची शस्त्रक्रिया केली आणि ती यशस्वी झाली असल्याची माहिती हिंदुस्थान टाइम्सने दिली. जर आपण वेळीच तिची शस्त्रक्रिया केली नसती तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असता असेही त्यांनी सांगितले. आता या महिलेची प्रकृती सुधारत आहे. या जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या रुग्णालयात फक्त सातच डॉक्टर आहेत. त्यामुळे या प्रश्नावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असेही बेचाऊ यांनी सांगितले.