केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील वादासंदर्भात अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय दिला. निवडणूक आयोगाने या निवडणुकीमध्ये केवळ ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही असे निर्देश दिले आहेत. दोन्ही गटांना त्यांच्या पसंतीची दुसरी चिन्हं आणि नावांची प्रत्येकी तीन पर्याय देण्याचे निर्देश आयोगाने दिले असून त्याला आज म्हणजेच १० ऑक्टोबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहेत. हा निर्णय आयोगाने दिलेल्यानंतर यासंदर्भातील विविध प्रतिक्रिया सोशल मीडीयावरुन समोर येऊ लागल्या. मात्र या निकालानंतर एक भावनिक ट्वीट करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी टाइप करताना पक्षाचं नावच चुकल्याचा दावा करणारा स्क्रीनशॉट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शेअर करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झालं असं की आयोगाने निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवल्याची बातमी रात्री नऊनंतर समोर आली. त्यानंतर यासंदर्भात वेगवेगळे नेते प्रतिक्रिया देत होते. शिंदे गटाबरोबरच उद्धव ठाकरे गटाकडूनही नेतेमंडळी प्रतिक्रिया देत असतानाच आदित्य यांनीही ट्वीटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मोठ्या फोटोसमोर उभं राहून भाषण देतानाचा उद्धव ठाकरेंचा फोटो आदित्य यांनी ट्वीट केला. या ट्वीटला त्यांनी, “खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही,” अशी कॅप्शन दिली.

तसेच, “लढणार आणि जिंकणारच” असा निश्चय व्यक्त करताना आदित्य यांनी, “आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!” असं या ट्वीटमध्ये म्हटलेलं. रात्री ११ वाजून १३ मिनिटांनी आदित्य यांनी हे ट्वीट केलं होतं.

नक्की वाचा >> BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…”

वर दिसणारं आदित्य यांचं ट्वीट सध्या ट्वीटरवर उपलब्ध असलं तरी या ट्वीटपूर्वी त्यांनी शिवसेना हे नावच चुकीचं लिहून ट्वीट केल्याचा दावा मनसे नेत्यानं केला आहे. मनसेच्या चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीटरवरुन त्याच रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी आदित्य ठाकरेंनी हटवलेल्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर केला. या स्क्रीनशॉटला खोपकर यांनी, “निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार युवराज आदित्य ठाकरे यांची अंमलबजावणी, तत्काळ काही वेळातच थेट युवराजानी बदलले पक्षाचे नाव…” अशी कॅप्शन देत ट्वीट केलं. या स्क्रीनशॉटमध्ये आदित्य यांनी हटवलेल्या पोस्टमध्ये ‘शिवसेना’ऐवजी ‘शिवेसना’ असं लिहिलं होतं.

नक्की वाचा >> Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

दरम्यान, रविवारीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात पक्षाच्या कोणत्याही नेत्याने प्रसारमाध्यमे अथवा समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देऊ नये असं आव्हान केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader ameya khopkar slams aditya thackeray as he misspell shivsena scsg