मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे राजकारणात चांगलेच सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी अमित ठाकरे १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते ढोल-ताशा पथकासोबत ढोल वाजताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या मुंबई, पुण्यासह सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत. करोनानंतर दोन वर्षांनी गणपती बाप्पाचे थाटामाटात जल्लोषात आगमन व्हावे, यासाठी सर्व ढोल ताशा पथक सज्ज झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ढोल ताशा पथकांच्या जोरदार सराव सुरु असल्याचे व्हिडीओ समोर आले होते. त्यातच आता अमित ठाकरे यांचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पुण्यातील दौऱ्यानिमित्ताने त्यांनी ढोल-ताशा पथकांच्या सरावाची पाहणी केली.
आणखी वाचा : राज ठाकरेंच्या नातवाचा पहिला फोटो समोर, कॅप्शन देताना अमित ठाकरे म्हणाले…

या पाहणीदरम्यान त्यांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. अमित ठाकरे यांनी या दौऱ्यावेळी कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पुण्यातील ढोलताशा पथकांच्या सरावाची पाहणी केली. पुण्यातील नूमवि शाळेतील एका ढोल पथकाला अमित ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी अमित ठाकरे यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. यानंतर अमित ठाकरेंनी कमरेला ढोल बांधत, एकच ताल धरत तब्बल १५ मिनिटे ढोल वादन केले. मनसे नेते गजानन काळे यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा : पुणे : प्रत्येक महाविद्यालयात मनसेच्या विद्यार्थी सेनेची शाखा ; अमित ठाकरे यांची माहिती

हा व्हिडीओ ३५ सेकंदांचा असून त्यात अमित ठाकरे हे ढोल कसा वाजवतात हे शिकून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच एका विशिष्ट लयबद्ध चालीत ते ढोल वाजवतानाही दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओवर अनेक मनसे नेते, कार्यकर्ते कमेंट करताना दिसत आहेत.

दरम्यान मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार हे गणेशोत्सवादरम्यान ढोल ताशा पथकात सहभागी होताना दिसतात. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सतत व्हायरल होत असतात. अभिनेता सौरभ गोखले, श्रुती मराठे, अनुजा साठे यांसह अनेक कलाकार हे ढोल वाजवतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यानंतर आता अमित ठाकरेंचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.