आजकाल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यांना मोबाईल लागतो. मोबाईल आता फक्त फोन करण्यापुरता राहिलेला नाही. त्यामुळे अनेक कामे होऊ शकतात. पण कधी कधी फोनचा अतिवापर होतो आणि त्यामुळे नुकसान आपलंच होतं. अनेकदा यामुळे आपला वेळ तर वाया जातोच; पण सतत स्क्रीन बघत राहिल्याने डोळ्यांचे त्रासदेखील ओढवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण, काही केल्या हे मोबाईलचं वेड कमीच होत नाही. जेवताना, अभ्यास करताना, काम करताना सतत मोबाईल हवाच असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात फोन वापरत असताना तरुणीच्या हातून मोबाईल सटकतो आणि गॅसवर ठेवलेल्या भांड्यात पडतो. पुढे नेमकं काय घडलं.. पाहा…

हेही वाचा… सीएनजी भरताना कर्मचाऱ्याने डोळाच गमावला! पुण्यात घडली धक्कादायक घटना, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक तरुणी किचनमध्ये जेवण बनविताना दिसतेय. जेवण करता करता ती तिच्या फोनमध्ये मग्न असल्याचे दिसतेय. मोबाईल स्क्रोल करताना अचानक गॅसवरील भांड्यात तो फोन पडतो. या भांड्यात एक पदार्थ शिजत असतो आणि त्यात खूप पाणी असतं. मोबाईल भांड्यात पडताच ती तरुणी एका चिमट्याच्या साह्याने मोबाईल बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. पण काही केल्या तो मोबाईल बाहेर निघत नाही. शेवटी खूप प्रयत्नांनंतर ती चिमट्यात फोन पकडते आणि बाहेर काढते.

हा व्हिडीओ @memes_are_talking या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला ‘डीप फ्राईड स्मार्टफोन रेसिपी’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्ब्ल २.२ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… ट्रेनमध्ये प्रवाशांनीच घेतली टीसीची शाळा, तिकीट तपासायला आली अन्…, VIDEO पाहून व्हाल चकित

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “जर मी हा मोबाईल ४ सेकंदांच्या आधी बाहेर नसता काढला, तर मी स्वत: किचनबाहेर पळालो असतो.” दुसऱ्याने, “महागडी रेसिपी”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “मला असं वाटत होतं की, फोन ब्लास्ट होईल.” एकाने, “आता तरी मोबाईल वापरणं बंद करा”, अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile fell into the hot water vessel which was on gas viral video social media dvr