सतत मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची ज्यांना सवय आहे, त्यांच्यासाठी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने जगभरातील १२-३४ या वयोगटातील तब्बल १३५ कोटी लोकांना बहिरेपणाचा येण्याची शक्यता आहे. दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असलेल्या मोबाईल फोनचे डिवाईस हेडफोन्स आणि ईयरबड्स तुमच्या बहिरेपणाच्या समस्येला कारणीभूत ठरू शकतात. तसेच डीजे पार्टी आणि मनोरंजनाच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या स्पिकरच्या मोठ्या आवाजाच्या संपर्कात असल्याने तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर असेलेल्या अधिकाऱ्यांनी स्टडी केला आहे. सुरक्षित आवाजात ऐकण्यासाठी सरकारकडून धोरणे आखण्याची आवश्यकता आहे, असं या अधिकाऱ्यांनी या स्टडीच्या माध्यमातून आवाहन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Sperm Count: भारतीय पुरुषांची चिंता वाढवणारी बातमी! शुक्राणू संख्येसंदर्भातील धक्कादायक माहिती आली समोर

आताच्या युगात मोबाईल फोन हातात घेतल्याशिवाय लोकांची सकाळ होत नाही, असं म्हणतात. ते सत्यच आहे. कारण रस्त्यावरून जाताना, गाडी चालवताना, ट्रेनच्या प्रवासात आणि विशेषत: घरी असल्यावर बहुतांश लोक मनोरंजनासाठी मोबाईल फोनवर गाणी ऐकतात. हेडफोन्स कानाला लावून मोठ्या आवाजामुळं लोकांना कानाचा कर्करोग झाल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळे सतत गाणी ऐकण्याची सवय तुम्हाला असेल, तर या गंभीर समेस्येपासून तुम्ही सावध झालं पाहिजे. डीजे पार्टीमध्ये मोठ्या आवाजाच्या संपर्कात येण्यापासून सावध राहिलं पाहिजे.

आणखी वाचा – Viral Video: अरे बापरे! हा काय प्रकार आहे? कॅमेरा सुरु होताच महिला झाली गायब, व्हिडीओ पाहून धक्काच बसेल

काही स्मार्टफोनमध्ये साउंड कंट्रोलिंग सिस्टीम असते. यावरून त्या आवाजाची क्षमता कळते. तसेच आवाज प्रमाणापेक्षा जास्त आहे की नाही, याबाबतही माहिती मिळते. तुम्हाला बहिरेपणासारख्या गंभीर समस्येचं समूळ उच्चाटन करायचं असेल, तर ऑटोमॅटिक व्हॉल्यूम डिवाइसचाही वापर करू शकता. त्यामुळे कानात ऐकू येणारा आवाज कमी होईल. ज्यांना गाणी ऐकण्याची खूप आवड आहे, त्यांनी कमी आवाजात गाणी ऐकल्यास तसेच हेडफोन्स आणि ईयरबड्सचा अनावश्यक वापर टाळल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile headphones and loud music in dj parties 135 crore young people risk hearing loss nss