सध्या देशामध्ये सर्वाधिक चर्चेचे दोन विषय म्हणजे लिंबाचे वाढलेले भाव आणि पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये एक लिंबू १० ते १५ रुपयांना मिळत आहे तर इंधनाचे दर जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये १०० हून अधिक रुपये प्रती लीटर इतके आहेत. महागाईचा निर्देशांकही १७ महिन्यांच्या उच्चांकावर आहे. त्यामुळेच एकंदरित महागाईने सर्वसामान्य वैतागलेत. असं असतानाच याच सर्व गोष्टींचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमधील एका मोबाईल विक्रेत्याने मार्केटींगसाठी केलाय. या व्यक्तीने त्याच्या दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांना लिंबू तसेच पेट्रोल मोफत देण्याची ऑफर दिलीय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: पंतप्रधान मोदींनी गुजरात दौऱ्यात पांढऱ्या रंगाचं हेल्मेट का घातलं होतं?; ‘या’ हेल्मेटच्या रंगामागे आहे एक विशेष कारण

वारासणीसमधील अभिषेक उपाध्याय नावाच्या मोबाईल शॉपच्या मालकाने लिंबू आणि इंधनाचे वाढते दर पाहून ग्राहकांसाठी विशेष ऑफर दिल्याची माहिती न्यूज २४ ला दिलेल्या मुलाखतीत दिलीय. “मागील काही दिवसांपासून लिंबूचे दर वाढलेत, इंधनाचे दरही फार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं बातम्यांमध्ये पाहिलं. त्यामुळेच मी मोबाईल विकत घेण्याची इच्छा असणाऱ्या किंवा मोबाईलचं अगदी छोटसं कामही असणाऱ्यांसाठी ऑफर आणलीय,” असं आपल्या ऑफर्सबद्दल सांगताना अभिषेक यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> विश्लेषण : बापरे! १० ते १५ रुपयांना एक लिंबू… पण अचानक का वाढलेत लिंबांचे दर?

पुढे बोलताना त्यांनी नेमकी ऑफर काय आहे याबद्दल माहिती दिलीय. “५० रुपयांची मोबाईलची टॅमपर्ड ग्लास किंवा कोणतीही अ‍ॅक्सेसरी विकत घेणाऱ्या ग्राहकांना दोन ते चार लिंबू मोफत दिले जातील. तर १० हजारांचा मोबाईल घेणाऱ्यांना एक लीटर पेट्रोल मोफत देणार आहे. २० हजारांचा घेतला तर दोन लीटर, ३० हजारांचा घेतला तर तीन लीटर, अशी ऑफर आहे,” असं अभिषेक यांनी सांगितलं.

अभिषेक यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला हजारोंच्या संख्येने व्ह्यूज आहेत.

Story img Loader