Mobile Showroom Robbery Video : देशभरात चोरीच्या अनेक घटना रोज घडत असतात. अनेक व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ हे फारच थरारक असतात. अशाच एका चोरीच्या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात तीन चोरटे पहाटेच्या वेळी मोबाईलच्या दुकानात शिरतात आणि अवघ्या चार मिनिटांत संपूर्ण दुकान लुटून पसार होताना दिसत आहेत. चोरीच्या या थरारक घटनेचे लाइव्ह दृश्य यावेळी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तेच आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोबाईल दुकानातील चोरीची ही घटना दिल्लीतील सर्वांत पॉश परिसर असलेल्या वसंत कुंज भागात घडली आहे. २४ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता मोबाईलच्या दुकानात चोरी झाली. चोरटे दुकानातील लाखोंचे मोबाईल गोणीत भरून पसार झाले. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

चोरांनी एकेक करून सर्व मोबाईल गोणीत भरले

व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार चेहऱ्यावर रुमाल बांधलेले तीन चोरटे मोबाईल शोरूममध्ये प्रवेश करतात. तिघांनी शोरूममध्ये शिरताच एकेक करून सर्व मोबाईल गोणीत भरले. अवघ्या चार मिनिटांत हे तीनही चोर मोबाईलचे दुकान रिकामी करतात आणि तिथून पळ काढतात.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन चोरटे तोंडावर रुमाल बांधून, शटर उघडून मोबाईल दुकानात प्रवेश करतात. त्यानंतर एक चोर गोणी पकडून उभा राहतो आणि दोघे शोकेसमध्ये ठेवलेले मोबाईल काढतात. त्यानंतर दुसरा एक खाली उतरतो आणि सर्व मोबाईल गोणीत भरू लागतो.

पाहा मोबाईल दुकानातील चोरीचे थरारक दृश्य

खतरनाक धुलाई! बंदुकीचा धाक दाखवून करू लागले बाईक चोरी, पण काही मिनिटांत उलटलं चित्र; पाहा थरारक घटनेचा VIDEO

तीन चोरट्यांनी अवघ्या चार मिनिटांत मोबाईलचे संपूर्ण दुकान केले रिकामी

अशा प्रकारे पहिली गोणी भरून झाल्यानंतर दुसरा चोर दुसरी गोणी घेऊन येतो. या गोणीतही हाताला लागतील तेवढे सर्व मोबाईल तो भरतो आणि नंतर दुकानातील इतर वस्तू जसे की, हेडफोन्स, चार्जरसह, पेनड्राइव्ह जे मिळते, ते गोळा करीत ते गोणीत भरू लागतात. अशा प्रकारे तीन चोरटे अवघ्या चार मिनिटांत मोबाईलचे संपूर्ण दुकान रिकामी करतात. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile showroom robbery video delhi robbery cctv 3 thieves break mobile store and steal several high end phones within 4 minutes in vasant kunj video viral sjr