सोशल मीडियावर सध्या एका फॅशन शोचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत! खरं तर, या व्हिडीओमध्ये एक मॉडेल कॅटवॉक करताना दिसत आहे. लॅव्हेंडर आणि ब्लॅक स्कर्टच्या सेटमध्ये ही मॉडेल मोठ्या आत्मविश्वासात दर्शकांसमोर कॅटवॉक करते. तिच्या हातात एक कोट देखील दिसून येत आहे. रॅम्पवर काही पाऊलं चालल्यानंतर ती आपल्या हातातला कोट फिरवते. नंतर पुन्हा काही पावलं ती पुढे चालत येते. काही पावलं पुढे ती एका दर्शकाला त्याच कोटने मारताला दिसून आली. असं दृश्य क्वचितच पाहायला मिळतं. कदाचित त्यामुळेच हा व्हिडीओ अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका फॅशन शोमधला हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येतंय. हा फॅशन शो ब्रिटीश डिझायनर ख्रिश्चन कोवानने आयोजित केला होता. या फॅशन शोदरम्यान एक महिला मॉडेल रॅम्पवर येताना दिसून येत आहे. सुरुवातीला, ती कोट हातात धरून हवेत भिरकावताना दिसून येते. त्यानंतर ती त्याच कोटने तिच्या उजवीकडे बसलेल्या प्रेक्षकांमधील कोणाला तरी मारताना दिसून येते. मग ती पुन्हा कॅटवॉक करत पुढे जाते आणि काही पोझ देऊन तिथून निघून जाते.

आणखी वाचा : चक्क विमानातच एअर होस्टेसने केला ‘Pushpa’ डान्स, एका चुकीमुळे आली चर्चेत, पाहा हा VIRAL VIDEO

अलीकडेच फॅशन डिझायनर क्रिस्टियन कोवानने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एक मॉडेल कॅटवॉक करत असताना अचान प्रेक्षकाला मारताना पाहिल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला. या प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील रंगली आहे. मॉडेल थिओडोरा क्विनलिव्हनला हिला देखील या व्हिडीओमध्ये टॅग करण्यात आलंय. “कॅरेनच्या जगात, ‘टेडी’ सारखं व्हा.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमधल्या मॉडेलचे इन्स्टा युजरनेम @teddy_quinlivan असं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ मूळतः सप्टेंबर २०२१ मध्ये चित्रित करण्यात आला होता. परंतू आता हा व्हिडीओ नव्याने व्हायरल होऊ लागलाय.

आणखी वाचा : केवळ ५ रूपयांत इडली-डोसा विकणारी ‘अम्मा’ होतेय VIRAL, कहाणी ऐकून कौतुक कराल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नेत्रहीन व्यक्तीची ‘डोळस’ कामगिरी! पाहू शकत नसला तरी स्केटिंग करत दाखवला पराक्रम

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून कॅटवॉक करता करता ही मॉडेल प्रेक्षकाला का बरं मारू लागली, असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. ही मॉडेल रॅम्पवॉक करत असताना त्यातल्या प्रेक्षकाने तिची छेड तर काढली नसावी ना, असा अंदाज काही युजर्सनी व्यक्त केला. पण असा कोणताही प्रकार घडलेला नसून हा केवळ फॅशन शोमधला एक स्टंट असल्याचं सांगण्यात येत आहे. हा केवळ फॅशन शोचा एक भाग होता.

आणखी वाचा : भिकाऱ्यासोबत पंगा घेतला, तर त्याने नोटांचा अक्षरशः पाऊसच पाडला… VIRAL VIDEO पाहून सारेच हैराण

फॅशन शोमध्ये मॉडेल कॅटवॉक करत असताना अचानक प्रेक्षकाला मारू लागली हे पाहून तिथे बसलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अनेक प्रेक्षक तर हातात मोबाईल पकडून मॉडेलचे हे कृत्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करताना दिसून आले. हा व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क होऊ लागले आहेत. प्रत्येक जण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या मॉडेलने प्रेक्षकाला का मारलं असा सवाल करताना दिसून येत आहे. या व्हिडीओवरील कमेंट्स देखील वाचण्यासारख्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Model hits audience member with her coat while walking on the ramp during fashion show bizarre viral video prp