अनेकदा लोक त्यांच्या आयुष्याचा, घराचा किंवा वाहनाचा विमा उतरवतात. पण ब्राझिलियन मॉडेलने १३ कोटी देऊन भलत्याच गोष्टीचा विमा उतरवला आहे. तिने तिच्या बटचा अर्थात पार्श्वभागाचा विमा उतरवला आहे. एका स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर या मॉडेलने तिच्या शरीराच्या एका भागाचा विमा काढण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिंकली अनोखी स्पर्धा

या ३५ वर्षीय मॉडेलचे नाव नाथी किहारा असल्याचे वृत्त आहे. किहाराने नुकतेच मिस बट वर्ल्ड २०२१ (Miss Butt World 2021) चे विजेतेपद पटकावले. इंस्टाग्रामवरील सर्व स्पर्धकांपैकी सर्वाधिक पसंती (मते) मिळविल्यानंतर किहाराला मिस बट वर्ल्ड म्हणून घोषित करण्यात आले.

( हे ही वाचा: पद्मश्री विजेत्याकडून पंतप्रधानांना खास गिफ्ट; भेट पाहून मोदींच्या चेहऱ्यावर आलं हसू )

हे विजेतेपद जिंकल्यानंतर आता ३५ वर्षीय किहाराने आपल्या पार्श्वभागाचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी १.३ मिलियन पौंड अर्थात भारतीय रुपयांचे १२ कोटी ९५ लाख रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच, किहाराने जवळ जवळ १३ कोटी रुपये देऊन तिच्या एका अवयवाचा विमा उतरवला आहे.

ब्राझिलियन मॉडेल म्हणते, “मी माझ्या बटमुळे (पार्श्वभागामुळे) प्रसिद्ध आहे. मी विजेतेपदही जिंकले आहे. त्यामुळे विमा उतरवला आहे.” किहाराचा दावा आहे की ती अजूनही तिच्या पार्श्वभागाच्या आकाराबद्दल समाधानी नाही, अधिक व्यायामाद्वारे वाढवण्याचे तिचे ध्येय आहे.

( हे ही वाचा: कंगनाच्या आझादीच्या ‘त्या’ विधानाचा अर्थ सांगतेय कॉमेडियन सलोनी गौर; व्हिडीओ व्हायरल )

( हे ही वाचा: Photos: “मी फक्त चकना खाल्ला, दारूच्या…” धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर भन्नाट मिम्सचा व्हायरल! )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

नथी किहाराने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत अनेक पोस्ट केल्या आहेत. विजेतेपद पटकावल्यानंतर त्याने एक फोटो अपलोड केला आहे. ज्यावर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. इंस्टाग्रामवर किहाराचे ५६० हजार फॉलोअर्स आहेत. त्याच्या प्रत्येक पोस्टवर हजारो वापरकर्ते प्रतिक्रिया देतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Model pays rs 13 crore for insurance of this special part reason it would be surprising to know ttg