सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ फार मनोरंजक; तर काही फार विचार करायला लावणारे असतात. काही वेळा काही व्हिडीओ आपण विचारही केला नसेल अशा वास्तव्याची जाणीव करून देतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हाला ग्लॅमरस दुनियेतील वास्तव्याची जाणीव होईल.

ग्लॅमर आणि मॉडेलिंगच्या जगात जरी आपल्याला लाईट्स, भव्य-दिव्य सेट्स आणि चकाकणारे अनेक सुंदर चेहरे दिसत असले तरी या जगातही प्रत्येक मॉडेलला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असते. दररोज कोणत्या ना कोणत्या आव्हानाचा सामना त्या करीत असतात. त्यात अगदी कमी वेळात कपडे बदलण्यापासून ते फॅशन शोदरम्यान शेकडो लोकांसमोर निर्भयपणे चालण्यापर्यंत अशी अनेक आव्हाने असतात. मॉडेलिंगदरम्यान चालताना अनेकदा अपघात होतात, काही वेळा मॉडेल्स लाइव्ह शोदरम्यानही कोसळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एका फॅशन शोदरम्यान एकामागोमाग एक-दोन मॉडेल्स चालता चालता खाली कोसळल्या.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Mother Play Aaj Ki Raat On harmonium And Son dancing
Video: आई-मुलाची जोडी इन्स्टाग्रामवर व्हायरल! ‘आज की रात’ गाण्यावर चिमुकल्याचा जबरदस्त डान्स; ठुमके, हावभाव पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
Funny Video Viral you will laugh after seeing what these four drunk people did
“डोंट ड्रिंक अँड डाईव्ह खूपचं मनावर घेतलंय”; मद्याच्या नशेत तरुणांनी केलं असं काही की, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Girl dance on Hi Poli Saajuk Tupatali marathi song video viral on social media trending news
“ही पोळी साजुक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद” तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

पाण्याचा ड्रम आणि मोटरपासून बनवली वॉशिंग मशीन, व्यक्तीचा जुगाड Video पाहून युजर्स म्हणाले, “भारतात टॅलेंट…”

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये Givenchy Spring Summer 2018 ची झलक पाहायला मिळत आहे. या शोदरम्यान एकामागोमाग एक मॉडेल पायऱ्या उतरून रॅम्पवर चालताना दिसत आहेत. अशाच प्रकारे एक मॉडेल जिन्यावरून खाली उतरत असते, यावेळी तिचे शूज पायऱ्यांमध्ये अडकतात आणि ती जोरात खाली कोसळते. त्यानंतर दुसरी मॉडेलही रॅम्पवर चालता चालता कोसळते. मग उपस्थित लोक तिच्या मदतीसाठी पुढे येतात.

@Runwaymodelll नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोक कमेंट करून मॉडेल्सच्या आयुष्यातील अडचणींबद्दल बोलत आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपल्याला ठाऊक असायला हवे की, अर्ध्या मॉडेल्सनी असे शूज घातले आहेत; जे त्यांच्या पायांना नीट फिट होत नाहीत.” दुसर्‍याने युजरने लिहिलेय, “त्यांच्या शूजकडे पाहूनच समजेल की, ते घालून चालणे किती कठीण आहे.” तिसर्‍याने लिहिलेय, “मॉडेल्सचा जीव धोक्यात घालून, त्यांना दुखापत करणाऱ्या डिझायनर्सचा मला खूप तिरस्कार वाटतो.” शेवटी एका युजरने सवाल केला, “डिझायनर्स कोणतेही कारण नसताना अशा पॅलेट पायऱ्या का बसवतात?”

Story img Loader