सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ फार मनोरंजक; तर काही फार विचार करायला लावणारे असतात. काही वेळा काही व्हिडीओ आपण विचारही केला नसेल अशा वास्तव्याची जाणीव करून देतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हाला ग्लॅमरस दुनियेतील वास्तव्याची जाणीव होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ग्लॅमर आणि मॉडेलिंगच्या जगात जरी आपल्याला लाईट्स, भव्य-दिव्य सेट्स आणि चकाकणारे अनेक सुंदर चेहरे दिसत असले तरी या जगातही प्रत्येक मॉडेलला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असते. दररोज कोणत्या ना कोणत्या आव्हानाचा सामना त्या करीत असतात. त्यात अगदी कमी वेळात कपडे बदलण्यापासून ते फॅशन शोदरम्यान शेकडो लोकांसमोर निर्भयपणे चालण्यापर्यंत अशी अनेक आव्हाने असतात. मॉडेलिंगदरम्यान चालताना अनेकदा अपघात होतात, काही वेळा मॉडेल्स लाइव्ह शोदरम्यानही कोसळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एका फॅशन शोदरम्यान एकामागोमाग एक-दोन मॉडेल्स चालता चालता खाली कोसळल्या.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये Givenchy Spring Summer 2018 ची झलक पाहायला मिळत आहे. या शोदरम्यान एकामागोमाग एक मॉडेल पायऱ्या उतरून रॅम्पवर चालताना दिसत आहेत. अशाच प्रकारे एक मॉडेल जिन्यावरून खाली उतरत असते, यावेळी तिचे शूज पायऱ्यांमध्ये अडकतात आणि ती जोरात खाली कोसळते. त्यानंतर दुसरी मॉडेलही रॅम्पवर चालता चालता कोसळते. मग उपस्थित लोक तिच्या मदतीसाठी पुढे येतात.
@Runwaymodelll नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोक कमेंट करून मॉडेल्सच्या आयुष्यातील अडचणींबद्दल बोलत आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपल्याला ठाऊक असायला हवे की, अर्ध्या मॉडेल्सनी असे शूज घातले आहेत; जे त्यांच्या पायांना नीट फिट होत नाहीत.” दुसर्याने युजरने लिहिलेय, “त्यांच्या शूजकडे पाहूनच समजेल की, ते घालून चालणे किती कठीण आहे.” तिसर्याने लिहिलेय, “मॉडेल्सचा जीव धोक्यात घालून, त्यांना दुखापत करणाऱ्या डिझायनर्सचा मला खूप तिरस्कार वाटतो.” शेवटी एका युजरने सवाल केला, “डिझायनर्स कोणतेही कारण नसताना अशा पॅलेट पायऱ्या का बसवतात?”