अंकिता देशकर
National Highway 44 Photos: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत होता की, जम्मू नॅशनल हायवे ४४ चा हा फोटो आहे. मोदी है तो मुमकिन है अशा कॅप्शनसह हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरोखरच जम्मू नॅशनल हायवेचं हे बदललेलं रूप आहे का? नेमकं या फोटोमागील सत्य काय या प्रश्नांची उत्तरे लाईटहाऊस जर्नालिज्मच्या तपासात समोरआली आहे .
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर Vivek Singh ने व्हायरल फोटो फेसबुक वर शेअर केला आहे, विश्वासच बसत नाही की हा आपला देश आहे असेही त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
अन्य यूजर्स देखील व्हायरल दावा शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्च वापरून आमचा तपास सुरू केला. virily.com च्या वेबसाइटवर आम्हाला हा फोटो सापडला.
तीन वर्षांपूर्वी अपलोड केलेल्या या लेखात हा फोटो चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) चा असल्याचे नमूद केले आहे.
आम्हाला हा फोटो caixinglobal.com वर देखील सापडला.
कॅप्शन मध्ये लिहले होते: वायव्य चीनच्या गान्सू प्रांतातील वेइयुआन-वूडू एक्स्प्रेस वे २०२० मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला आहे. फोटो:व्हीसीजी
आम्हाला चीन सरकारची एक प्रेस नोट देखील सापडली आहे, ‘Longnan section of Weiwu Expressway opened for trial operation’.
त्यानंतर आम्ही गोळा केलेल्या माहितीतून ‘गूगल अर्थ’ वर हे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला.
आम्ही वेबवर जम्मू आणि काश्मीर महामार्ग ४४ देखील शोधले पण प्राप्त परिणाम व्हायरल फोटोसारखे नव्हते.
निष्कर्ष: जम्मू आणि काश्मीर हायवे ४४ चा दावा करणारा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, मात्र मुळात हा फोटो चीनमधील आहे.