पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता येणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे. मतमोजणीमध्ये तृणमूलने विजयी आघाडी मिळवली आहे. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तृणमूल काँग्रेसने विजयासाठी आवश्यक असणारा बहुमताचा आकडा गाठलाय. तर भाजपाची घौडदौड १०० जागांच्या आतच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. असं असतानाच ममता बॅनर्जींवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली जात आहे. करोना कालावधीमध्ये मोठ्याप्रमाणात प्रचारसभा घेऊनही भाजपाला पराभव पत्करावा लागत असल्याने मोदींसहीत अमित शाह आणि भाजपावर विरोधकांनी टीका करत ममतांचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लूकवरुनही आता टीका होऊ लागली आहे. बंगालमधील जनतेला मतदानासाठी संबोधित करताना मोदींनी रविंद्रनाथ टागोर यांच्यासारखा लूक ठेवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सोशल नेटवर्किंगवर सुरु होती. मात्र आता या लूकचाही मोदींना काही फायदा झाला नसून त्यांनी दाढी कापावी असा खोचक टोला विरोधकांनी ट्विटरवरुन लगावलेला दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा