पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबईमध्ये ‘मुंबई समाचार’च्या ‘द्विशताब्दी महोत्सवा’मध्ये सहभागी झाले. या कार्यक्रमामध्ये भाजपा समर्थकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरच मोठं शक्तीप्रदर्शन केल्याचं पहायला मिळालं. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवरुन या कार्यक्रमातील असाच एक व्हिडीओ पोस्ट करत पुढील निवडणुकांबद्दल भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> पंतप्रधान मोदींसमोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींना दिली ‘एक्स्चेंज ऑफर’; म्हणाले, “फार मोठं आणि…”

मंगळवारी पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. मोदींनी आधी पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केलं. त्यानंतर ते मुंबईतील राजभवनातील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये साकारण्यात आलेल्या “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाबरोबरच ‘जल भूषण’ या नवीन इमारतीच्या उदघाटन सोहळ्याला हजर होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे २०० वर्षांपासून सातत्याने प्रकाशित होत असलेल्या ‘मुंबई समाचार’च्या ‘द्विशताब्दी महोत्सवा’मध्ये सहभागी झाले. मुंबईमधील सर्व कार्यक्रमांच्या वेळेस मोदींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. मात्र ‘मुंबई समाचार’च्या मंचावर जेव्हा उद्धव ठाकरेंना शाल आणि सन्मानचिन्हं देऊन गौरवण्यात आलं तेव्हा सभागृहामधील भाजपा समर्थकांनी ‘मोदी… मोदी’ असा जयघोष केला.

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे सध्या तडफडत आहेत कारण… किरीट सोमय्यांनी थेट…
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत, भाषणात म्हणाले; “यावेळी मला सूड…”

नक्की वाचा >> “मुख्यमंत्री म्हणतील, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती मग जिंकायची गरज काय? आजपासून…”; शरद पवारांच्या उमेदवारीवरुन खोचक टोला

उद्धव ठाकरेंनी आपल्या आसनावरुन उठून उभं राहून सन्मान स्वीकारला. मात्र उद्धव ठाकरे उभे राहताच सभागृहामधील भाजपा समर्थकांनी, ‘मोदी… मोदी…’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. उद्धव ठाकरे शाल आणि सन्मानचिन्हं स्वीकारतानाही सभागृहामध्ये ‘मोदी… मोदी’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. हाच व्हिडीओ शेअर करताना, अमित मालवीय यांनी, “महाराष्ट्रात वारं कोणत्या दिशेने वाहतंय हे यातून दिसतंय… फक्त पुढची निवडणुक येऊ द्या,” अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलीय.

नक्की वाचा >> Photos: बाटल्यांचा खच, Keychains ला बंदी अन् झाडांवरील पिशव्या… देहूत मोदींच्या कार्यक्रमातील सुरक्षा नियमांमुळे वारकऱ्यांची धावपळ

नक्की वाचा >> Photos: बाटल्यांचा खच, Keychains ला बंदी अन् झाडांवरील पिशव्या… देहूत मोदींच्या कार्यक्रमातील सुरक्षा नियमांमुळे वारकऱ्यांची धावपळ

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे असं आपल्या भाषणात म्हटलं. “मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे आणि होर्मुसजी कामा साहेब हे आमच्या कुटूंबियांपैकी एक आहेत. मी गुजराती समजू शकतो पण बोलू शकत नाही. त्यामुळे उद्यापासून मुंबई समाचार वाचायला सुरु करतो. मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये २०० वर्षे गुजराती वर्तमानपत्र यशस्वीपणाने वाटचाल करत आहे. गुजराती आणि मराठी महाराष्ट्रामध्ये दुधात साखरेप्रमाणे मिळून विरघळून गेलेलो आहोत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Story img Loader