पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवसाच्या बंगलादेश दौऱ्यावर होते. या दौऱ्यातील त्यांच्या भाषणांबरोबरच त्यांनी हिंदू मंदिराला दिलेली भेट आणि पश्चिम बंगाल, आसाममधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्यावरुन आरोप प्रत्यारोपांमुळे दौरा चांगलाच गाजला. याशिवाय या दौऱ्यामधील मोदींच्या भाषणातील संदर्भ आणि त्यांनी ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारक येथील नोंदवहीमधील लिहिलेल्या संदेशाचा फोटोही चांगलेच व्हायरल झाले. या नोंदवहीमध्ये मोदींनी लिहिलेल्या संदेशाबरोबरच त्यांच्या हस्ताक्षराचं कौतुक होत असल्याचं चित्र इंटरनेटवर दिसून आलं. मात्र आता मोदींचं हे हस्ताक्षर खरं आहे की खोटं असा प्रश्न काँग्रेसच्या एका नेत्याने उपस्थित केलाय. यासंदर्भातील एक व्हिडीओच या नेत्याने पोस्ट केलाय.
मोदींच्या बांगलादेश दौऱ्यानंतर शेख हसीनांची ‘ती’ साडी चर्चेत; जाणून घ्या कारणhttps://t.co/nxtxsrgKew
सध्या सोशल मीडियावर बांगलादेशच्या पंतप्रधानांनी नेसलेल्या या साडीची तुफान चर्चा आहे#PMModi #PMmodiinBangladesh #Bangladesh #SheikhHasina #ModiInBangladesh #Dhaka #ViralPhotoआणखी वाचा— LoksattaLive (@LoksattaLive) March 29, 2021
झालं असं की, महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशमधील शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकामधील नोंदवहीत केलेल्या नोदींचा फोटो पोस्ट केला. “काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी बांगलादेश दौऱ्यावर बांगलादेश मुक्ती संग्रामातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी एक श्रध्दांजली संदेश शहीदांना अर्पण केला आहे. त्या संदेशासोबत त्यांचे अतिशय सुरेख आणि सुंदर अक्षरसुद्धा पाहण्यासारखे आहे,” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली होती.
काल माननीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांनी बांगलादेश दौऱ्यावर बांगलादेश मुक्ती संग्रामातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी एक श्रध्दांजली संदेश शहीदांना अर्पण केला आहे. त्या संदेशासोबत त्यांचे अतिशय सुरेख आणि सुंदर अक्षरसुद्धा पाहण्यासारखे आहे. pic.twitter.com/gYjzX9zuwp
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 28, 2021
मात्र या फोटोवर काँग्रेसमधील अनुसुचित जाती विभागातील प्रदेश कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या डॉ. जितेंद्र देहाडे यांनी ट्विट करुन रिप्लाय केलाय. या ट्विटमध्ये देहाडे यांनी साबरमती आश्रमातील भेटीचा जुना व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये साबरमती येथील नोंदवहीमध्ये आधीच लिहून ठेवलेल्या संदेशावर मोदी स्वाक्षरी करताना दिसत आहेत. “माननिय पंतप्रधान हे नेहमीच आधीच लिहिलेल्या संदेशावर स्वाक्षरी करतात. यावर कधी कोणीही आक्षेप घेतला नाही मग हा सुंदर हस्ताक्षराचा खटाटोप कशासाठी. मा.पंतप्रधान यांनी साबरमती आश्रम मधील भेटीत अभ्यागत पुस्तकामधे आधीच लिहिलेल्या संदेशावर स्वाक्षरी केली होती,” असं दहाडे यांनी म्हटलं आहे.
मा.पंतप्रधान हे नेहमीच आधीच लिहिलेल्या संदेशावर स्वाक्षरी करतात. यावर कधी कोणीही आक्षेप घेतला नाही मग हा सुंदर हस्ताक्षराचा खटाटोप कशासाठी.
मा.पंतप्रधान यांनी साबरमती आश्रम मधील भेटीत अभ्यागत पुस्तकामधे आधीच लिहिलेल्या संदेशावर स्वाक्षरी केली होती. @LoksattaLive @Marathi_Rash https://t.co/KAxJ6X5GZt pic.twitter.com/K4YOe7akdC
— Dr. Jitendra Dehade (@jitendradehade) March 28, 2021
तसेच त्यांनी महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टॅग करत, “चंद्रकांत पाटील दादा, आपल्या पक्षाच्या सोशल मिडिया टीमची कीव येते. एवढा खोटेपणा कशासाठी…” असा प्रश्न विचारला आहे.
@ChDadaPatil दादा, आपल्या पक्षाच्या सोशल मिडिया टीम ची कीव येते.
एवढा खोटेपणा कशासाठी…
— Dr. Jitendra Dehade (@jitendradehade) March 28, 2021
दहाडेच नाही तर भाजपाच्या या ट्विटखाली अनेकांनी मोदींनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या भेटीदरम्यान वेगवेगळं हस्ताक्षर पहायला मिळाल्याचे फोटो ट्विट केले. पाहुयात यापैकीच काही ट्विट…
१)
— आयुष्-Man (@theindianannoy) March 28, 2021
२)
हो ना दर वेळेस साहेबांसोबत एकच माणूस कसा असेल असे काही लिहायला pic.twitter.com/TuqiBNMjOv
— Vijay Dinanath Chouhan (@aayesaala) March 28, 2021
३)
हे अक्षर कुणाचे? pic.twitter.com/i37esG2Z0K
— Maheboob Ali (@MaheboobAliINC) March 28, 2021
४)
फेका फेकी ची पण हद झाली राव!! सहीच्या खाली दिनांक आणि कॉलम मधील दिनांक यांची लिपी पहिली तर लहान मुलाला पण समझेल खरे अक्षर कोणाचे ते.उगाच लोकांस बनवा बनवी आणि चातुकरिता. pic.twitter.com/HCQazweqwl
— محمد خواجہ (@To_KhwajaSk) March 28, 2021
५)
हे अक्षर परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांचे असते. पंतप्रधान केवळ संदेश वाचून खाली सही करतात, अशी माझी माहिती आहे.
— श्याम उगले (@shyam_ugale) March 28, 2021
इतकच काय तर एकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच २०१४ साली अशाच एका व्हायरल फोटोवर दिलेला रिप्लाय शोधून तो भाजपाच्या ट्विटवर पोस्ट केलाय. या रिप्लायमध्ये मोदींनी, “विचार आणि स्वाक्षरी माझी असली तरी हा संदेश इतर कोणीतरी लिहला आहे,” असं म्हटलं आहे.
@manojsirsa Ofcourse, the thoughts and the signature are mine…it has only been written by somebody else. 🙂
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2014
बांगलादेशमधील नोंदवहीचा हा फोटो मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता या पोस्टच्या निमित्ताने तो पुन्हा चर्चेत आलाय.