नोटाबंदीच्या निर्णयाला आता लवकरच एक महिना पूर्ण होईल. देशातील भ्रष्टाचार कमी व्हावा आणि काळ्या पैशाला आळा बसावा यासाठी आपण नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत असल्याचे मोदींनी सांगितले. पण त्याचबरोबर ८ नोव्हेंबरला केलेल्या भाषणात ५० दिवसांत देशातील परिस्थिती सुधारली नाही तर मला कोणत्याही चौकात जनतेने शिक्षा द्यावी. ती मला मान्य असेल असेही मोदींनी सांगितले होते. त्यामुळे आता #मोदीजी_को_चौराहे_पर_सजा हा हॅशटॅश ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये दिसत आहे. अनेकांनी आता ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नोटाबंदीनंतर देशातील परिस्थिती सुधारली नसून ती आणखी वाईट होत चालली आहे, अशा टीका विरोधकांनी अनेकदा केली. गेल्याच आठवड्यात झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी आता राजीनामा देणार काय असा सवाल केला होता. त्यातून नवीन वर्षांत पेट्रोलच्या किमतीही वाढल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांत दुस-यांना पेट्रोलच्या किंमती वाढल्या. अनेक एटीएममध्ये आजही पैसे उपलब्ध नाहीत. तर पैसे काढण्यावरच्या मर्यादाही हटवण्यात आल्या नाहीत. ५० दिवस उलटूनही परिस्थिती बदलली नाही म्हणूनच नेटीझन्सने ट्विट करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे #मोदीजी_को_चौराहे_पर_सजा हा हॅशटॅग वापरून नेटीझन्स आपली नाराजी व्यक्त करत आहेत. आदल्याच दिवशी एका ट्विटर युजरने देश खड़ा दोराहे पर #मिलोगो किस चौराहे पर असे विचारत ट्विट केले होते. तोही हॅशटॅश ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये पाहायला मिळाला.
त्यातूनच मोदी आज लखनौमध्ये परिवर्तन रॅली घेणार आहेत नववर्षातील मोदींची ही पहिलीच सभा असून या सभेत मोदी उत्तरप्रदेशसाठी काय घोषणा करणार आणि समाजवादी पक्षाच्या कलहावर मोदी काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देश के चौराहे तैयार है, मोदी जी फरार है#मोदीजी_को_चौराहे_पर_सजा@ArvindKejriwal @iAlokAgarwal pic.twitter.com/VmmKMjZymZ
— Vivek Gupta (@30guptavivek) January 2, 2017
#मोदीजी_को_चौराहे_पर_सजा देने को वो लोग भी आ रहे हैं जिनके रोजगार नोटबन्दी के कारण बंद हो गया है pic.twitter.com/ln35EKda0y
— GANESH परदेशी SURAT (@GM_Pardeshi) January 2, 2017
किसान नोटबन्दी की वजह से ठगा सा महसूस कर रहे है। ।।।#मोदीजी_को_चौराहे_पर_सजा
— GANESH परदेशी SURAT (@GM_Pardeshi) January 2, 2017
https://twitter.com/yoginipipariya/status/815833407351463936
#मोदीजी_को_चौराहे_पर_सजा @AAPGujarat campaign @ Valsad pic.twitter.com/747LAZslJj
— Manoj Sorathiya (@manoj_sorathiya) January 2, 2017