डॉ. भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर २०१९ मधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. १६ जुलै २०१९ च्या या व्हिडीओमध्ये डॉ. भारती पवार लोकसभेत मराठीमध्ये राज्यातील दुष्काळ परिस्थितीसंदर्भात भाषण करत होत्या तेव्हा भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नव्हतं. आज एकीकडे प्रीतम मुंडे, रक्षा खडसेंना मंत्रिमंडळ विस्तारातून डावलल्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा रंगत असतानाच दुसरीकडे मंत्री झालेल्या भारती पवार यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. पाहुयात नक्की काय घडलं होतं….

लोकसत्ता डॉटकॉमचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Story img Loader